Home जळगाव पाचोरा येथे भागवत सप्ताह मध्ये श्री कृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

पाचोरा येथे भागवत सप्ताह मध्ये श्री कृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

81
0

निखिल मोर

पाचोरा , दि. ०६ :- येथील शक्ती धाम मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .या सप्ताहात श्रीकृष्ण जन्मोत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी सर्व भक्तगण जन्म उत्सवात मंत्रमुग्ध झाले होते भडगाव रोडवरील शक्तिधम मध्ये दिनांक २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या सप्ताहात परमपूज्य संत गोपाळकृष्ण जीव व्यास यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा चे पठन करण्यात येत आहे .

या सप्ताहाची सुरुवात दिनांक २९ रोजी करण्यात आली यावेळी शहरातील अंबाजी माता मंदिर गांधीनगर बाजोरिया नगर अग्रसेन स्तंभ कालिका माता मंदिर या मार्गा ने भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली होती तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव सजीव देखावे करून उत्साहात साजरा करण्यात आला भाविकांनी उत्सवाचा आनंद लुटला शक्ती धाम परिसर गोविंद बोलो हरी गोपाल बोलो जयघोषात भक्तिमय झाले होते या सप्ताहाचे आयोजन शक्ती धाम उत्सव समिती पाचोरा, शक्तिधम ग्रुप पाचोरा ,सकल राजस्थानी समाज पाचोरा ,शक्तिधम महिला शक्ती पाचोरा , तर्फे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती कडून करण्यात आले आहे.