मुंबई

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल

गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश

गिरीश भोपी

मुंबई , दि. ०६ :- राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश गृहविभागास दिले आहेत.

महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून यात हयगय करणाऱ्यांना माफी नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

घडलेल्या गुन्ह्यांचा एफआयआर तत्काळ नोंदवणे, लवकरात लवकर तपास सुरु करणे, गुन्हा सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांचे संकलन करणे, न्यायालयात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणे, परिपूर्ण पुराव्यांसह या केसेस न्यायालयात अभ्यासपूर्ण रितीने मांडणे या सगळ्या गोष्टींसाठी शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून त्यादृष्टीने त्यांना आवश्यक असलेले कायदेविषयक संरक्षण आणि सहकार्य पुरवणार आहे. यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणेला अधिक सजग आणि दक्ष पणे काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

*महिला अत्याचारांच्या घटनांची दखल*

महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची माहिती पोलीस ठाण्यात येऊन नोंदवता यावी यााठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणी सुरु करण्यासंबंधी गृहविभागाने चाचपणी करावी असेही आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

*गुन्हासिद्धतेसाठी विशेष प्रयत्न*

महिला अत्याचारांच्या घटनेत न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास खुप विलंब लागतो. यात न्यायासाठी झगडणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. असे होऊ नये, गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावा यासाठी महिला अत्याचाराच्या केसेस लवकरात लवकर निकाली लागतील यासाठी राज्य शासन फास्ट ट्रॅक कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना यासारख्या गोष्टीं प्राधान्याने हाती घेणार आहे. राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण हा ही त्यातील एक महत्वाचा विषय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

You may also like

मुंबई

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात अभिनेत्री पायल घोष यांचा जाहीर प्रवेश

रवि गवळी मुंबई , दि. २७ – केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा.

मुंबई ,  (प्रतिनिधी) – बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या ...
मुंबई

महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली जाणार नाही – पँथर ऑफ सम्यक योद्धाचा इशारा

मुंबई , (प्रतिनिधी) – कोणत्याही राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता तसेच महामानवांच्या वंशजांवर अवमानकारक टीकाटिप्पणी सहन केली ...
मुंबई

सक्ती व बेशिस्त कर्जवसुली थांबवा अन्यथा हातपाय तोडू – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई – कोरोना महामारी संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वित्तीय संस्थांनी सक्त बेशिस्त दमनकारी कर्जवसुली थांबवावी अन्यथा ...
मुंबई

गोर बंजारा वेशभूषेत मुंबई येथील बहूमजली कारपोरेट कार्यालयाचे उदघाटन सोहळा संपन्न – उदघाटक, गोर पारूबाई जधव

मुंबई –  बंजारा हृदय सम्राट, उद्योगपती, गोर किशनभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाणे मुंबई येथील ...
मुंबई

यूपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून जातीय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात – पँथर डॉ राजन माकणीकर

लाखो सह्यांसह मा. राष्ट्रपती यांना शिस्तमंडळ भेटणार मुंबई , (प्रतिनिधी) – भारतात आरएसएस प्रणित भाजप ...