Home यवतमाळ घाटंजी येथील गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर..!

घाटंजी येथील गिलानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर..!

71
अयनुद्दीन सोलंकी 
घाटंजी : घाटंजी येथील गिलानी विद्यालयात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा (वय १३) विनयभंग केल्याप्रकरणी त्याच शाळेतील सहाय्यक शिक्षक सचिन बळवंत ठाकरे (वय ३५) यांचे विरुद्ध भादंवि कलम ३५४ (ड), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १२ पोक्सो नुसार गुन्हा नोंदवुन घाटंजी पोलीसांनी आरोपी सचिन ठाकरे यांस अटक केली होती.
दरम्यान, सदर प्रकरणात आरोपी सचिन ठाकरे यांनी ॲड. राजेश साबळे यांचेमार्फत जिल्हा न्यायाधीश १, तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डाॅ. गौरी कवडीकर यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात न्यायाधिश डॉ. गौरी कवडीकर यांनी शुक्रवारी आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. आरोपी तर्फे ॲड. राजेश साबळे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अल्पवयीन पिडीता ही शाळेत तांदुळ आणण्यासाठी शाळेतील कार्यालयाजवळ गेली होती. तेथे त्याच शाळेतील सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे उभे होते. त्या वेळेस शिक्षक ठाकरे हे अल्पवयीन पिडीतेला विचारले की, तुला परिक्षेत किती गुण मिळाले असे असता, पिडीतेने चांगले गुण मिळाले नसल्याने शिक्षकाला सांगितले. त्या नंतर तांदुळ आणण्यासाठी घरुन आणलेली थैली क्लासरुम मधुन आणण्यासाठी गेली असता वर्गात शिक्षक ठाकरे हे खुर्चीवर बसुन होते. त्यावेळेस अल्पवयीन पिडीतेला शिक्षकाने ईशारा करुन जवळ बोलावले. त्यामुळे अल्पवयीन पिडीता व त्याची मैत्रीण भार्गवी घोडे हे दोघेही शिक्षकाजवळ गेले. त्या वेळी सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे तु इतक्या दिवसांपासून माझ्या सोबत बोलत कां नाही, असे अल्पवयीन पिडीतेला विचारले. तसेच तु मला फोन कां करित नाही व नाश्त्यासाठी सुद्धा घरी बोलावली नाही, असे सांगितले. सदरची घटना अल्पवयीन पिडीतेने त्याची मैत्रीण प्रियंका ठक हिला सांगितले. तेव्हा तिने म्हटले की, तुला फोन कर याचा अर्थ समजला काय..? असे म्हटले वरुन, अल्पवयीन पिडीता व मैत्रीण यांनी वर्ग शिक्षक डी. मस्के यांना सांगितले. त्यावर मस्के म्हणाले की, सचिन ठाकरे यांचे नेहमीचे नाटक आहे. ते दरवर्षी एका मुलीला फसवतो असे म्हटले. नंतर मस्के हे गिलानी विद्यालयाचे उप प्राचार्य बुरांडे यांना घटनेची माहिती दिली. त्यावेळेस उप प्राचार्य बुरांडे हे मी ठाकरे यांना समजावुन सांगतो, असे म्हटले. तेव्हा अल्पवयीन पिडीतेने त्यांना शाळेतुन काढुन कां टाकत नाही, असे उप प्राचार्य बुरांडे यांना म्हटले.
सहाय्यक शिक्षक सचिन ठाकरे हे मागील दोन महिन्यांपासून वाईट उद्देशाने ईशारे करुन घरांकडे जातांना माझा पाठलाग करत असुन अल्पवयीन पाडीतेचा विनयभंग केल्याच्या जबानी रिपोर्ट वरुन आई माधुरी हेंमत काळे सह घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या वरुन आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करुन अटक केली होती.
पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे सदर प्रकरणात पुढील तपास करीत आहे.