Home मराठवाडा श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम

श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम

197

 

घनसावंगी -लक्ष्मण बिलोरे

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर या शाळेतील कब्बडी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम बाजी मारून जिल्हास्तरीयसाठी संघाची निवड झाली आहे.

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे,सचिव श्रीमंततात्या शिसोदे,उपाध्यक्ष अमर सिसोदे,कोषाध्यक्ष तुषार शिसोदे,मुख्याध्यापक बी.एन.माडजे,संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.