Home उत्तर महाराष्ट्र शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीत मूळ दुर्गसंवर्धन संस्थाना डावलले.

शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीत मूळ दुर्गसंवर्धन संस्थाना डावलले.

138

सांस्कृतिक,पर्यटन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या नावे पाठवले निवेदन.

नाशिक :-राज्य शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या “राज्य व विभागीय दुर्गसंवर्धन समिती,मध्ये नाशिक विभाग व वसई,पालघर विभागातील मूळ अनुभवी दुर्गसंवर्धन संस्थाना डावलले आहे.ज्यांना दुर्गसंवर्धन कार्याची धड माहिती नाही,अभ्यास नाही,की त्यांनी कधी दुर्गसंवर्धन मोहिमा केल्या नाहीत अश्या मंडळींना या समितीत घेण्याचे दुर्दैवी काम निवड प्रक्रिया समितीने केले आहे.इतिहास अभ्यासक,व काही दुर्गसंवर्धन संस्थांचे प्रतिनिधी सोडून या समितीत नाशिक व वसई भागावर अनुभवी राबत्या दुर्गसंवर्धन संस्थाना।प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने अनेक संस्था, संघटना व व्यक्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या समितीत नाशिक विभागातून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ,वसई दुर्ग मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांना सहभागी करावे अश्या आशयाचे पत्र राज्याचे सांस्कृतिक पर्यटन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना (दि २ डिसें.)रोजी देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक दुर्गांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे,नाशिकची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था संस्थापक राम खुर्दळ यांच्या अभ्यासात्मक नेतृत्वात गेल्या २१ वर्षा पासून नाशिक जिल्ह्यातील विविध गडकोटाचे संवर्धन ,रामशेजच अखंडित दुर्गसंवर्धन,व ऐतिहाशिक वास्तूंच्या जतन,संवर्धनासाठी अखंडित राबत आहे,तर वसई दुर्ग मोहीमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत यांच्या नेतृत्वात पाळघर,वसईच्या समुद्री किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठी चळवळ कार्यरत आहे.या कामाची माहिती इतिहास अभ्यासक,पुरातत्व विभाग व प्रमुख दुर्गसंवर्धन संस्थाना असताना नाशिक,वसई पालघर येथील जाणकार कृतिशील दुर्गसंवर्धन संस्थाना राज्य शासनाच्या विभागीय दुर्गसंवर्धन समितीत डावलले हा निवड समितीचा मोठा दोष आहे.यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर)यांना भेटून आपली कैफियत मांडणार असल्याचे या पत्रात राम खुर्दळ यांनी सांगितले. यासंदर्भात निवेदन देतेवेळी शिवकार्य गडकोटचे राम खुर्दळ, पर्यावरण मित्र ऍड प्रभाकर वायचळे,दरीमाता पर्यावरणाचे तथा वणवा मुक्ती अभियानाचे भारत पिंगळे,शिवाजी भाऊ पिंगळे यावेळी उपस्थित होते,दरम्यान स्वराज संघटना या विवंचने विरोधात आवाज उठवणार आहे,तसेच छत्रपती संभाजीराजे यांना ही बाब सांगणार आसल्याचे स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ता करण गायकर यांनी सांगितले.

फोटोत ;-
सांस्कृतिक पर्यटन मंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देतांना शिवकार्य गडकोटचे राम खुर्दळ, ऍड प्रभाकर वायचले,भारत पिंगळे,शिवाजी भाऊ धोंडगे,

दुसऱ्या छायाचित्रात स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर यांना भेटून दुर्गसंवर्धन समितीच्या निवड प्रक्रियेबाबत भेट घेतली त्यावेळी श्री गायकर यांनी दिलेली शाल श्रीफळ