Home विदर्भ निम्न पेढी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी युवा लॉयन्स सामाजिक संघटनेच्यावतीने दिनांक 25-01-2022...

निम्न पेढी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी युवा लॉयन्स सामाजिक संघटनेच्यावतीने दिनांक 25-01-2022 पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू

115

मनिष गुडधे – अमरावती.

युवा लॉयन्स सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व निंभा,वासेवाडी गावच्या पुनर्वसन मागणीसाठी दिनांक 24-01-2022 रोजी निम्न पेढी प्रकल्पाचे काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले होते.
परंतु दिवसभरात मागण्या पूर्ण न झाल्यामुळे व संबंधित अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे धरणे आंदोलनाचे स्वरूप बदलून दिनांक 25-01-2022 पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरु करण्यात आले. आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या.


1) मागणी:- निम्न पेढी प्रकल्पाचा सर्वात जास्त धोका धरणाच्या गेट समोर 100 मीटर अंतरावर असणाऱ्या निंभा व वासेवाडी गावाला असून या दोन्ही गावांचे तात्काळ पुनर्वसन करा..
2)मागणी:- निम्न पेढी प्रकल्पात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करा.
3)मागणी:- दाब युक्त बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम ज्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीमधून होत आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्‍टरी 2 लाखाची मदत मिळावी.
4)मागणी:- एक धरण एक न्याय.
5) मागणी:-सरळ पद्धतीने केलेल्या खरेदीचा मोबदला.
6) मागणी:- दिडचा गुणक दोन मध्ये दोन मध्ये कन्व्हर्ट करा.

वरील 6 मागण्यांसाठी 27 ऑक्टोबर 2021 रोजी हजारो शेतकर्‍यांच्या वतीने गौरखेडा फाटा येथे आत्मक्लेश जमीन समाधी आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता,कृषी आयुक्त, तथा भातकुली तहसीलदार मॅडम यांनी लेखी पत्र देऊन या मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र तीन महिने होऊन सुद्धा या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे.
दिनांक 25-01-2022 रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी व निंभा गावाचे गावकरी नागरिक बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण आंदोलनावर बसले असून आता मेलो तरी चालेल,पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
या आंदोलनाला निम्न पेढी प्रकल्प संघर्ष समिती, निंभा ग्रामपंचायत, अळणगाव ग्रामपंचायत, व विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला असून आंदोलन अजून तीव्र होण्याची शक्यता आहे.
आंदोलनामध्ये शेकडो नागरिक उपस्थित असून,
युवा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
पै.योगेश भाऊ गुडधे, प्रतिक भाऊ हिवराळे,प्रफूल भाऊ कोकाटे,अजाबराव तायडे, प्रविण भाऊ शिरसाट, गोपाळराव शिरसाट, कृष्णा भाऊ लोणारे, महेंद्र भाऊ ओलोकर,शशिकांत भाऊ देशमुख, प्रवीण भाऊ धांडे, गोविंद भाऊ गिरी इत्यादी शेतकरी बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहेत.
दिनांक 27-01-2022 पासून शेकडो नागरिक या उपोषणावर बसणार असून आंदोलन अजून तीव्र होणार आहे..