Home विदर्भ नायलान मांजाने गळा कापल्यामुळे युवक जखमी “संबंधित विभागाचे दुर्लक्ष”

नायलान मांजाने गळा कापल्यामुळे युवक जखमी “संबंधित विभागाचे दुर्लक्ष”

81

इकबाल शेख
वर्धा

तळेगांव (श्या.प.) :- येथील सिडेट कंपनीतील कामगार संदीप परोपटे हे सुट्टी झाल्यानंतर दुचाकीने घरी परत जात असतांना पतंग उडवणाऱ्या नायलन मांजाने त्यांचा गळा चिरला यात संदीप परोपटे गंभीर जखमी झाले आहे.

तळेगांव येथील नागपूर अमरावती महामार्गावरील सिडेट या कंपनीत काम करणारे कामगार संदीप भास्कर परोपटे सुट्टी झाल्यावर सायंकाळी दुचाकीने परत जात असताना नागपूर अमरावती महामार्गाच्या शेजारी दोन मुले पतंग उडवत होते यात पतंगीचा नायलन मांजा दिसला नसल्याने त्यांचा गळा चिरला यात ते गंभीर जखमी झाले. गळ्यावर मोठी इजा झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी तळेगांव येथे नेण्यात आले, तेथून त्यांना आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तिथे त्यांच्यावर उपाचार करून 24 टाके लागले त्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले.

नायलन मांजावर बंदी असताना शहरात मोठया प्रमाणात पतंग उडविण्यासाठी मांजा विक्री होत आहे. तीळसंक्रात जवळ येत असल्याने लहान मुले पतंग उडवतात. काही ठिकाणी पतंग उडवण्याचा उत्सव घेत असतात. तळेगाव येथे काही दिवसापासुन लहान- मोठे मुले मोठ्या प्रमाणात पतंग उडवित असल्याचे दिसत आहे. पण यावर संबंधित विभागाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा तळेगावात होत आहे नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा हा नायलॉन मांजा गावांमध्ये येतो तरी कुठून असा सवाल गावकऱ्यांमध्ये उपलब्ध होत आहे याला जबाबदार कोण असे गावकरी बोंबाबोंब करीत आहे.