Home विदर्भ ग्राहक पंचायत यवतमाळ जिल्हा द्वारा ग्राहक पंधरवडा संपन्न

ग्राहक पंचायत यवतमाळ जिल्हा द्वारा ग्राहक पंधरवडा संपन्न

99

यवतमाळ :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहक हित जपणारी संघटना असून,ग्राहक हितार्थ चळवळीचे मजबूत संघटन आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 रोजी दिनांक 24 डिसेंबर 1986 ला अस्तित्वात आला या अंतर्गत ग्राहकांवर अन्याय होणार नाही व त्यांच्या हिताचे ,अधिकाराचे संरक्षण होईल या बाबत ची उपाययोजना कायद्याने अभिप्रेत केली आहे.

व याच भावनेने अखिल भारतीय ग्राहक पंचायत यवतमाळ जिल्हा व तालुका चे पदाधिकारी, कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्राहक सक्षमीकरण जागृती चे कार्य करीत आहे त्याच अनुसंघाने यवतमाळ ग्राहक पंचायत द्वारे ग्राहक पंधरवडा दिनांक 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत जिल्हाध्यक्ष डॉ नारायण मेहरे व जिल्हासंघठन मंत्री हीतेश सेठ यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. या पंधरवडयात महसुल अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद,महावितरण,
शिक्षणाधिकारी, अन्न व औषध प्रशासन,जीवन प्राधिकरण,वजन माप अधिकारी, उपप्रादेशिक परिवहनअधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी या विभागातील अधिकारी यांना भेटून ग्राहकांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा पत्र दिले.राष्ट्रीय ग्राहक दीन दिनांक 24 डिसें.रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व माय स्टॅम्प तसेच विशेष कव्हर { पॉकेट}चे विमोचन करण्यात आले ,26 डिसेंबर ला प्रयासवन येथे वृक्षारोपण करून पंधरवडा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष ॲड.राजेश पोहरे, सचिव डॉ शेखर बंड, संघटन मंत्री राजेंद्र कठाळे व सदस्य विपुल पोबारु,अनंत भिसे, चंद्रकांत गड्डमवार,प्रा.हरिदास धुर्वे, जिनेंद्र बंगाले,प्रकाश चनेवार,मोहन कुळकर्णी, राधामल जाधवाणी ,वीरेंद्र चौबे,गजानन निंबोकार,शरद मन्नरवार,किसन मोरे, नंदकुमार इंगोले,संजय फाळके,मनीष जैन आदी ने प्रयत्न केले.