Home मराठवाडा घुंगर्डे हदगाव येथील ह्रदयद्रावक घटना,विवाहितेने ४ लेकरांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

घुंगर्डे हदगाव येथील ह्रदयद्रावक घटना,विवाहितेने ४ लेकरांसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

46
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील एका विवाहित महिलेने पोटच्या ४ लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घुंगर्डे हदगाव येथील अडाणी या प्रतिष्ठित परिवारातील हि धक्कादायक घटना घडली आहे.शुक्रवारी तीन मुली आणि एक मुलगा घेवून सदर महिला शेतात गेली होती परंतु मुलाबाळांसह परत घरी आलीच नाही.सदरील घटना कौटुंबिक कलहातून घडली असल्याचे सांगितले जात आहे.या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेचा पंचनामा केला.या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी,वय ३२ वर्षे असं या मयत महिलेचे नाव असून तीचे लेकरं मयत भक्ती वय १३ वर्षे,ईश्वरी ११ वर्षे,अक्षरा ९ वर्षे, युवराज ७ वर्षे अशा प्रकारे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.गुरूवारी,३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी हि महिला आपल्या तीन मुली आणि एक मुलगा सोबत घेऊन शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्याचे अनेकांना दिसून आले.गंगासागरने आपल्या मुलाबाळांसोबत सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतातच टाईमपास केला.सायंकाळी सात वाजले तरी गंगासागर आणि तिच्या सोबत असलेल्या चार मुली आणि मुलगा कुणीच परत न आल्याने गंगासागरचा पती ज्ञानेश्वर अडाणी आणि गावातील नागरिक यांनी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली परिसरातील विहिरी, कालवा,चाऱ्या वगैरे सर्व काही धुंडाळून काढले तरी या माय लेकरांचा थांगपत्ता लागत नव्हता.आज शुक्रवारी सकाळी गंगासागर या महिलेने आपल्या चार लेकरांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.सदर घटनेची माहिती गोंदी पोलिसांना मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.मयत गंगासागर हिचा पती ज्ञानेश्वर यास या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास सुरू आहे.