Home वाशिम नगरपालिका कर्मचा-यास मारहाण; शासकिय कामात अडथळासह अॅट्रोसिटिअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल

नगरपालिका कर्मचा-यास मारहाण; शासकिय कामात अडथळासह अॅट्रोसिटिअंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल

93

फुलचंद भगत

वाशिम :- कारंजा नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कार्यरत सहाय्यक आरोग्य निरीक्षक राहुल सावंत यांना दोन जणांनी रास्ता अडवून अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना दि.१३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:२० च्या दरम्यान घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावंत यांच्या फिर्यादी वरून विविध कलमान्वये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली नाही असे समजते.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३ ऑक्टोबर रोजी फिर्यादी राहूल शिवाजीराव सावंत (वय ४०) वर्ष रा. रमाबाई कॉलनी कारंजा यांनी पोलीस स्टेशन कारंजा येथे लेखी रिपोर्ट दिला की, ते दुपारी २:२० च्या सुमारास मोटार सायकलने घरी जात असतांना मोहम्मद सलिम मो. ईस्माईल चव्हान याने सावंत यांना आवाज देवून थांबविले तसेच कॉलर पकडून चापटाने मारहान केली. मारहाण करतांना जावेद वाहाब चाऊस यांनी मागून पकडून ठेवले. व सलिम तेली याने जातीवाचक शिवीगाळ करून ‘मेरी दूकान गिराई तूम्हारी इतनी हिम्मत अशी धमकी दिली. तसेच मुख्याधिकारी यांच्या बद्दल अपशब्दाचा वापर करून टिप्पर साह्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
राहुल सावंत यांच्या जबानी व लेखी फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अप नं. ७९०/२०२१ कलम ३५३, ३३२,२९४,५०६,३४, भां.द.वि.नुसार तसेच सहकलम ३ (१) (र).३ (१), (एस) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा हे करित आहेत. दरम्यान या घटनेनंतर नगर पालिका वर्तुळात खळबळ माजली होती तसेच नगर पालिका कर्मचाऱ्यास केलेल्या मारहाणीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206