Home विदर्भ दलित पँथर च्या वतीने प्रबोधकार ठाकरे लिखित पुस्तकाचे मोफत वितरण

दलित पँथर च्या वतीने प्रबोधकार ठाकरे लिखित पुस्तकाचे मोफत वितरण

240

धम्मप्रवर्तन 22 प्रतिज्ञा वाचन विश्लेषण कार्यक्रम संपन्न

अकोला  – नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पँथर च्या वतीनेराज्यभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला , विजयादशमी निम्मित एकमेकांना आपट्या चे पानाला सोनं समजून एकमेकांना सोनं (आपट्या )देऊन हैप्पी दसरा म्हणून हस्तआंदोलन करण्याची परंपरा आहे परंतु दलित पँथर चे राष्ट्रीय कार्या अध्यक्ष भाई जगदीश कुमार यांनी आपट्याचे पानं सोनं म्हणून स्वीकारले परंतु त्या बदल्यात प्रभोधनकार ठाकरे लिखित धर्माची देऊळे देऊळचा धर्म हे पुस्तकं मोफत वितरित करण्यात आले.
प्रामुख्याने प्राथमिक शिक्षण घेत असणाऱ्या मुला मुलींना हे पुस्तकं मोफत वितरित करून धम्म्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती दलित पॅन्थर चे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे यांनी प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.