Home बीड प्यार हो तो ऐसा ???

प्यार हो तो ऐसा ???

476

 

 

पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने शिक्षक महिलेची छोट्या मुलीसह आत्महत्या!

अमीन शाह ,

 

कोरोनाने जगभरात अनेकांचे जीव घेतले. त्यानंतर होणारे परिणाम अजून ही दिसत आहे व दिसत राहतील. असाच प्रकार बाणेगाव ता. केज जि. बीड येथे घडला. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार शितल जाधव या शिक्षकेने अपल्या दोन वर्षाच्या लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

        शितल जाधव या पुणे येथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती राजाभाऊ जाधव यांना सहा महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यानंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली परंतु त्यांची ऑक्सीजन लेवल कमि रहात होती. त्यामूळे कोरोना नंतर चार महिने ऑक्सीजन सिलेंडर लावलेला होता. त्यानंतर त्यांना घरी शिफ्ट केले. घरी शिफ्ट केल्यानंतर ऑक्सीजन काढण्यात आला. परंतु स्कोर कमी जास्त होत असे. यातच त्यांचा मागील महिन्यात मृत्यू झाला. राजाभाऊ जाधव हे मूळचे वडजी ता. वाशी जि. उस्मनाबाद येथील होते. तेही पुणे येथे माध्यमिक शाळेत शिक्षक होते. सहा दिवसापूर्वी त्यांचे पहिले मासिक मुळगाव वडजी येथे झाले होते. त्यानंतर शितल जाधव आपल्या माहेरी बाणेगाव येथे गेल्या होत्या. त्यांचे पतीवर अतिशय प्रेम होते. पतीच्या निधनानंतर त्यांचा विरह सहन न होऊन त्यांनी काल आपल्या लहान मुलीला आपल्या पोटाशी ओढणीने घट्ट बांधले व विहिरीत उडी मारली. विहिरीत गाळ असल्यामुळे त्या गाळात अडकून राहिल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अथक परिश्रमा नंतर रात्री बारा वाजता त्यांचे प्रेत काढण्यात गावकऱ्यांना यश आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.