Home मराठवाडा दानवेंचा अभ्यास कमी पडतो – नाना पटोल

दानवेंचा अभ्यास कमी पडतो – नाना पटोल

479

जालना – लक्ष्मण बिलोरे

– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा अभ्यास कमी पडतो आहे.१०२ वी घटनादुरुस्ती कशासाठी केली होती. ते रावसाहेबांनी सांगावे आणि आता परत १२७ वी घटनादुरुस्ती कशासाठी केली हेही सांगावे.केंद्रातील मोदी सरकारने २०१८ मध्ये राज्य सरकारांना दिलेले अधिकार काढून घेतले होते.त्यामुळे महाराष्ट्र राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर हि लढाई उभी करून आपसात भांडणे लावली आहेत.रावसाहेबांच्या हे लक्षात येते पण ते वेगळेच बोलतात,अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली.ते पुढे म्हणाले,’ मी स्वत: विधानसभा सभापती पदाच्या खुर्चीत बसून ५० टक्के आरक्षण मर्यादा उठवण्याचा ठराव केला आहे.मग त्याचा १२७ च्या घटनादुरूस्तीमध्ये समावेश का केला नाही.हे रावसाहेबांनी सांगितले पाहिजे.भाजप आरक्षण विरोधी आहे.भाजपचे मुळ संघ आहे.आणि त्याचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला आहे.त्यामुळे आरक्षणाबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,माजी आमदार कल्याण काळे, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य भिमराव डोंगरे, रविंद्र दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख,माजी अध्यक्ष आर. आर. खडके, प्रभाकर पवार, जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमुद,सत्संग मुंढे, गटनेते गणेश राऊत उपस्थित होते.