Home मराठवाडा मानवी जीवनात ज्ञान आणि नाम महत्त्वाचे,ज्ञानाने भगवंत समजतो तर नामाने भगवंताची ओळख...

मानवी जीवनात ज्ञान आणि नाम महत्त्वाचे,ज्ञानाने भगवंत समजतो तर नामाने भगवंताची ओळख होते – हभप विष्णु महाराज आनंदे यांचे प्रतिपादन

126

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील मधुकरी अखंड हरिनाम सप्ताहाची सोमवारी सांगता झाली. गुरूवारी,१२ आॅगष्ट रोजी चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध युवा किर्तनकार विष्णु महाराज आनंदे मासेगावकर यांचे किर्तन झाले.
प्रस्तुत किर्तन सेवेसाठी घेतलेल्या
संत जगतगुरू जगत वंदनीय संत श्रेष्ट तुकाराम महाराजांच्या गाथेतील ३ चरणाच्या अभंगावर विष्णु महाराज आनंदे यांनी विवेचन केले.

*देव तिही बळें धरिला सायासें |*
*करुनियां नास उपाधीचा ||१||*

*पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन |*
*स्वयें जनार्दन ते ची झाले ||२||*

*तुका म्हणे यासी न चले तांतडी |*
*याअनुभवें गोडी येईल कळों ||३||*

सर्व समाज सुखाचा भुकेला आहे.सर्व सुखासाठी धावपळ करत आहेत. तुकोबाराय म्हणतात’ मी ज्या मार्गावरून मार्गक्रम करत आहे, त्या मार्गाचा आपण अंगीकार करावा. तुम्ही या मार्गाचा अंगीकार केल्यास आणि सतत भगवंताचे नामस्मरण केल्यास निश्चितच भगवंत भेटेल. माझ्याकडे सत्ता ,संपत्ती , धन नाही उपाधीचा मी नाश केला आहे. मानव जीवनात फक्त ज्ञान आणि नामा ची ओळख असली पाहिजे. ज्ञानाने भगवंत समजतो आणि नामाने भगवंताची ओळख होते.आणि ज्यांना भगवंताची ओळख झाली तो देव होतो.त्यासाठी नामसंकिर्तन , वैष्णवांची जोडी लागते. ज्यांच्या घरी वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, तेथे नामस्मरण सतत होते. तेथे पांडुरंग परमात्मा चे वास्तव्य राहते .देवघरात असला पाहिजे. तुकाराम महाराजांनी त्याग , जनाधरांचा धिक्कार केला. आणि त्यांना मोठे होण्यासाठी उपाधीचा नाश करावा लागला .असे त्यांनी सांगितले. मनी भाव असला पाहिजे भीती कितीही सांगून जनाधारांना कळत नाही. तुकाराम महाराजांनी देव घ्या कोणी देव घ्या म्हणून व्यवहाराच्या माध्यमातून जनाधार पर्यंत देव आणला ,परंतु कोणी देव घ्यायला तयार नाही. लोक ‘ देव न लगे ‘ म्हणू लागले. म्हणून सर्व पक्षी धातु धिक्कारिले जन स्वयें जनार्दन ते ची झाले .तुकाराम महाराज म्हणतात परमार्थात येण्यासाठी गरबड करा परंतु येथे आल्यानंतर गरबड करू नका ज्ञान, कला शिकून घ्या. या अनुभवाने तुम्ही मोठे व्हाल असे भागवताचार्य विष्णु महाराज आनंदे यांनी स्पष्टीकरण केले.