Home मराठवाडा अंबड-घनसावंगी तालुक्यातील अतिरिक्त ऊसाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मा.आमदार विलास खरात यांचे साखर आयुक्तांना...

अंबड-घनसावंगी तालुक्यातील अतिरिक्त ऊसाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मा.आमदार विलास खरात यांचे साखर आयुक्तांना निवेदन

480

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड-घनसावंगी तालुक्यातील अतिरिक्त ऊस साखर आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय अधिकाराचा वापर करून इतर साखर कारखान्यांना जोडून अतिरिक्त ऊसाची विल्हेवाट लावावी या आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार विलासराव खरात यांनी दिले आहे.अंबड – घनसावंगी तालुक्यात समर्थ,सागर आणि समृद्धी असे तीन साखर कारखाने आहेत.

या साखर कारखान्यांची हंगामात १७ ते १८ लाख मेट्रिक टन गाळप क्षमता आहे.परंतु या मतदारसंघात साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३० लाख मेट्रिक टन ऊसाची लागवड झालेली आहे.उर्वरित १२ ते १३ लाख मेट्रिक टन अतिरिक्त ऊस राहणार आहे.अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहे . वेळेवर ऊस नाही गेल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.अतिरिक्त ऊसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.या बाबतीत गांभीर्याने दखल घेऊन साखर आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय अधिकाराचा वापर करून अतिरिक्त ऊस इतर साखर कारखान्यांना जोडून देण्यात यावा अशी विनंती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने विलास खरात यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.