Home जळगाव आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन हीच आदिवासींची खरी ओळख- सपोनि डी.डी इ़गोले

आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन हीच आदिवासींची खरी ओळख- सपोनि डी.डी इ़गोले

244

रावेर(शेख शरीफ)

तालुक्यातील मोठा वाघोदा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी भिल नवयुवकांतर्फे सामाजिक जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करीत आदिवासी दिवस साजरा केला मोठा वाघोदा येथील निंभोरा रोडवरील तडवी वाडा अलफतेह नगर निंभोरा रोड या भागातील तडवी भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी दिनाचे संस्कृती जतन व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा व खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य चालू मिस्त्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आहेत यावेळी सपोनि डी.डी इंगोले यांनी आदिवासीं समाज बांधवांनी आदिवासी संस्कृती चे जतन व संवर्धन करावे हीच आदिवासींची खरी ओळख-असल्याचे सांगितले तसेच नवयुवकांनी शिक्षणाची कास धरावी शिक्षणामुळेच मनुष्य आपल्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार बनू शकतो असेही ते म्हणाले या समयी मोठे वाघोदा येथील सरपंच मुबारक तडवी यांनी ही मनोगत व्यक्त केले माजी सरपंच कालु मिस्तरी,राजेंद्र सावळे असलम सलीम तडवी , संजीव रमजान,तसलीम छबू,समीर पोलिस पाटील, बबलू तडवी भैय्या महाजन,तसेच सदस्य हशिर तडवी बबलू तडवी ,न्याजोद्दीनं तडवी,मुक्तार हबीब अजीत निजाम अकमल तडवी आदि सह नवयुवक महिला वर्ग सहभागी होते.