Home मराठवाडा जाफ्राबाद येथील पत्रकार यांना मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा

जाफ्राबाद येथील पत्रकार यांना मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा

355

बदनापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन

जालना , बदनापूर /  प्रतिनिधी : जाफ्राबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करुन आरोपींना तात्काळ अटक करावे, अशी मागणी बदनापूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्याकडे बदनापूर तालुक्यातील पत्रकारांच्यावतीन एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जाफ्राबाद येथील एका दैनिकाचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफीयांनी हल्ला केल्याची घटना 11 जून रोजी घडली असुन, वाळूच्या बातम्या का छापतो असा प्रश्न विचारत वाळू माफीयांनी पत्रकाराला जबर मारहाण केली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पत्रकारांवर हल्ले वाढले असुन, पत्रकारांची मुस्कटबाजी करण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे हल्लेखोरांचे मनोधैर्य उंचावले आहे. यामुळे पत्रकारांवर हल्ले वाढले असल्याचे निवेदनाच्या शेवटी नमुद करण्यात आले आहे. या निवेदनावर पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अजहर बदनापूरकर , बदनापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष सय्यद जलील, सा.लोकअंदाजचे संपादक शेख जमशेर, एकांतचे संपादक सय्यद रफीक अजीज, पत्रकार शेख रईस, निवृत्ती डाके, मुनवर सय्यद, नजीर इनामदार, सा. युगसत्य चे संपादक बाबासाहेब हिवराळे,धुराजी गुठे, हारुन पठाण, जे.व्ही.शेख, सय्यद सिकंदर, संजय उनगे परमेश्वर अंभोरे, आदींच्या सह्या आहेत.