Home मुंबई कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्याचे संगोपन आरपीआय डेमोक्रॅटिक करेल.:- डॉ. राजन माकणीकर

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाल्याचे संगोपन आरपीआय डेमोक्रॅटिक करेल.:- डॉ. राजन माकणीकर

193
0

मुंबई दि (प्रतिनिधी) कोविड साथीच्या संसर्गात दोन्ही पालक गमावलेल्या पाल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सर्वार्थाने संगोपन करेल अशी ग्वाही राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

आंम्ही आंबेडकरवादी रिपब्लिकन मानवता जोपासतो, ही सेवा नाही कर्तव्य समजतो असे ब्रीद अंगीकृत करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या प्रभावि मार्गदर्शन नेतृत्वाखाली आणि डॉ राजन माकणीकर यांच्या देखरेखीखाली कोरोना महायोद्धा म्हणून युद्ध पातळीवर विविध उपक्रम राबविन्यात येत आहे.

कोरोना संसर्गातून दोन्ही पालक गमावून बसलेल्या पाल्याचे सर्वार्थाने संगोपन करणार असल्याचे सूतोवाच पक्षाच्या वतीने डॉ राजन माकणीकर यांनी दिले. हा निर्णय पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशावरून घेण्यात आल्याचे त्यांनी स्पस्ट केले. अश्या नि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्याचे आवाहन डॉ. माकणीकर यांनी केले आहे.

लावरीस कोरोना मयताचा अंत्यविधी सुद्धा पक्षाच्या वतीने करण्यात येत असल्याचे डॉ. माकणीकर सांगीतले असून संबंधीत आरोग्य केंद्रांनी रिपब्लिकन भवन ला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.