Home रायगड कर्जत तालुक्यातसह माथेरान येथील BSNLचे मोबाईल नेटवर्क बंद

कर्जत तालुक्यातसह माथेरान येथील BSNLचे मोबाईल नेटवर्क बंद

71
0

कर्जत: जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील BSNL सेवा अनेक दिवसांपासून ठप्प झाली असून शेकडो ग्राहकांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे.त्याचबरोबर तालुक्यातील
माथेरान येथील BSNLचे दूरध्वनी केंद्र (कार्यालय) हे गेली एक वर्षा पासून बंद आहे .या कार्यलयाला कुलूप लावलेले असुन BSNLचे अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित रहात नाही त्यामुळे लॅन्ड लाईन व मोबाईल धरकांनी त्यांची तक्रार कोठे करायची ?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शंकर पारटे यांनी विचारला आहे

गेली अनेक वर्षे झाली येथील BSNL चे मोबाईल नेटवर्क सतत बंद पडत आहे .लॅन्ड लाईन ची (OFC) ऑप्टिकल फायबर लाईन सतत बंद पडत आहे .त्यामुळे येथे इंटरनेट सेवा व बॅंकिंग सेवा बंद पडत आहे .काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला तर येथील नेटवर्क बंद पडते DC बेटरी बेकप हे अंत्यत कमी क्षमतेचे आहे त्यामुळे ते लगेज डीसचार्ज होते .व त्यामुळे नेटवर्क बंद पडते .वीजपुरवठा खंडीत झालातर जनरेटर का चालू केले जात नाही ?

काही कारणास्तव जनरेटर चालू करणे शक्य नसल्यास BSNL ने येथे सोलर पावर पेनल बसवून येथील विज पुरवठा कायमस्वरूपी कसा राहील याकरिता पर्यायी वीज उपलब्ध होईल याकरिता येथे सोलर पेनल बसविण्यात यावेत अशी येथील लॅन्ड लाईन व मोबाईल धरकांची रास्त तक्रार आहे.