Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जवळपास दुप्पट तर  जिल्ह्याबाहेरील (अकोला,...

यवतमाळ जिल्हात 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जवळपास दुप्पट तर  जिल्ह्याबाहेरील (अकोला, वाशिम) दोन मृत्युसह एकूण 14 मृत्यु 

374
0

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1293 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 20 : गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. जिल्ह्यात 443 जण पॉझेटिव्ह तर 823 जण कोरोनामुक्त झाले असून 14 जणांचा मृत्यु झाला. यातील सात मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. तसेच 14 पैकी दोन मृत्यु अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 7972 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 443 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3654 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1855 तर गृह विलगीकरणात 1799 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69744 झाली आहे. 24 तासात 823 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64410 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1680 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.45 , मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 83 वर्षीय महिला, तालुक्यातील 38 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, नेर येथील 42 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 52 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यामध्ये वणी येथील 65 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात दिग्रस येथील 50 वर्षीय पुरुष व 50, 55 वर्षीय महिला, घाटंजी येथील 45  वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 79 वर्षीय पुरुष आणि अकोला येथील 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 443 जणांमध्ये 271 पुरुष आणि 172 महिला आहेत. यात वणी येथील 107 रुग्ण पॉझेटिव्ह, यवतमाळ 69,  दिग्रस 51, नेर 32, पांढरकवडा 30, पुसद 25, दारव्हा 19, उमरखेड 17, घाटंजी 16, मारेगाव 14, आर्णि 13, बाभुळगाव 11, महागाव 11, राळेगाव 8, कळंब 7, झरीजामणी 6 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 560088 नमुने पाठविले असून यापैकी 557888 प्राप्त तर 2200 अप्राप्त आहेत. तसेच 488144 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.           

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1293 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 32 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2244 आहे. यापैकी 951 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1293 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 311 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 266 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 143 रुग्णांसाठी उपयोगात, 383 बेड शिल्लक आणि 32 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1141 बेडपैकी 497 उपयोगात तर 644 बेड शिल्लक आहेत.