Home जळगाव क्रेडीट एक्सेस ग्रामीण ‍लिमिटेड फायनान्स कंपनी लि.कडून पोलीस प्रशासनास कोरोना प्रतिबंधात्मक किटचे...

क्रेडीट एक्सेस ग्रामीण ‍लिमिटेड फायनान्स कंपनी लि.कडून पोलीस प्रशासनास कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वितरण

120

रावेर (शरीफ शेख)

कोविड 19 मुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण परसरले आहे. लोक या आजाराच्या ‍विचाराणे ग्रासले आहे. कठीण काळातही आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहुन कोरोना योध्दा म्हणुन कर्तव्य्‍ बजावणा-या रावेर, सावदा, व फैजपुर येथील पोलीस स्टेशनच्या पोलीस अधीकारी यांना क्रेडीट एक्सेस ग्रामीण ‍लिमिटेड फायनान्स कंपनी कडून सॅनिटायझर व मास्क प्रदान करण्यात आले.

या वेळी उपस्थीत रावेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो.नि. शीतलकुमार नाईक,व सहकारी उपस्थीत होते.,सावदा पोलिस स्टेशनचे पो.नि. देविदास इंगोले व सहकारी उपस्थीत होते.,तसेच फैजपुर येथील पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रकाश वानखेडे व सहकारी उपस्थीत होते.

वरील रावेर, सावदा, व फैजपुर येथील पोलीस स्टेशनच्या पोलीस अधीकारी यांना क्रेटीड एक्सेस ग्रामीण ‍लिमिटेड फायनान्स कंपनी कडून सॅनिटायझर व मास्क प्रदान करण्यात आले.यावेळी क्रेटीड एक्सेस ग्रामीण ‍लिमिटेड फायनान्स कंपनी ब्रांच मॅनेजर योगेश पळसपगार, ब्रांच मॅनेजर विनायक सोळंके ब्रांच मॅनेजर सागर नेमाणे, मॅनेजर निखील वरखडे,कर्मचारी वृंदासह पोलीस बांधव उपस्थीत होते.