Home महत्वाची बातमी महाराष्ट्रातील पत्रकारांच्या खात्यावर किमान १० हजार रुपये जमा करण्याची पत्रकार संरक्षण समिती...

महाराष्ट्रातील पत्रकारांच्या खात्यावर किमान १० हजार रुपये जमा करण्याची पत्रकार संरक्षण समिती तर्फे भांगे यांनी केली मागणी

80
0

प्रतिनिधी 

कोरोना काळात सर्वच घटकातील उद्योगाला सरकार थोडीफार मदत करत असून, या काळात देशाचा चौथा खांब दुर्लक्षित झाला आहे, सरकारने पत्रकारांच्या उदरनिर्वाहासाठी किमान पाचशे कोटींचे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकाराच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीच्या वतिने पत्रकार राजेश एन भांगे केली आली असुन,
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्यातून पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

तर इतर उद्योगा प्रमाणे पत्रकारितेतील व्यवसायांना सुद्धा कोरोना सारख्या महामारी या आजाराचा फटका बसला असून पत्रकारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळेच सरसकट पत्रकारांना सरकारने मदत करावी.

तर छोटी-मोठी वृत्तपत्र बंद पडण्याच्या मार्गावर आहे,
तसेच छोट्या-मोठ्या पत्रकार संपादकांनी आपली आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चहा विक्री करून जिवन पुढे ढकलत आहेत.
द शिराळा न्यूजचे संपादक नवनाथ पाटील यांची व्यथा काळजाला पाझर फोडणारी ठरली असून, समाजाला दिशा देणारा पत्रकार, आज पोटाच्या खळगी भरण्यासाठी दिशा हीन झाला आहे.

कोरोना काळात पत्रकारितेला जीवदान देण्यासाठी शासनाने पत्रकारांच्यासाठी ५०० कोटी चे पॅकेज जाहीर करून प्रत्येक पत्रकारांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा करावे अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे नांदेड जिल्हा पदाधिकारी राजेश एन भांगे देगलूरकर, यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.