Home मराठवाडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय औरंगाबाद येथे जयंती...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय औरंगाबाद येथे जयंती साजरी करण्यात आली

136
0

 

औरंगाबाद – आज दि. 30/04/2021 रोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे ना व मंजुळा होते त्यांच्या बारश्याला दिनांक ११ मे १९०९ रोजी आकोटचे श्री हरीबुवा, माधानचे प्रज्ञांचक्षु श्री .संत गुलाबराव महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव ‘माणिक’ ठेवले आणि आशीर्वाद देवून निधून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. वरखेडचे श्री.संत आडकोजी महाराज त्यांचे गुरू होते त्यानी त्यांचे नाव ‘तुकड्या’ ! असे ठेवले.
इ.सन.१९२५ मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन,कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरीवर उत्तम भजने गायली.
५ एप्रिल १९४३ रोजी श्री गुरुदेव मुद्रणालय याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. १९ नोहेंबर १९४३ शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. हरीजनां साठी त्यांनी मंदिरे खुली केली ते म्हणत गावा गावासी जागवा । भेदभाव समूळ मिटवा” उजळा ग्रामोन्नतिचा दिवा । तुकड्या म्हणे |
यावेळी मुख्य अभियंता डी. डी. उकीर्डे साहेब, सहाय्यक मुख्य अभियंता एस.यम. मांगुळकर साहेब,
उपविभागीय अभियंता जी. ए. पातुरकर साहेब,
उप कार्यकारी अभियंता वाय. पी. जाधव साहेब, शाखा अभियंता एस. बी. चाळक साहेब,
विदुर भाऊ लाघडे जिल्हाध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष जालना ) , राजेंद्र गायकवाड तालुकाध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष अंबड) , जुबेर पटेल (प्रहार रूग्ण सेवक जालना) , अशोक शेजूळ (सामाजिक कार्यकर्ता), लक्ष्मण मिंड (प्रहार सेवक आैरंगाबाद) व बाबा खान (शिपाई सार्वजनिक बांधकाम कार्यालय आैरंगाबाद) आदी उपस्थित होते.