Home विदर्भ निष्क्रिय घाटंजी पं. स. ला अँक्टिव्ह करणे गरजेचे

निष्क्रिय घाटंजी पं. स. ला अँक्टिव्ह करणे गरजेचे

122
0

कोरोना काळात ग्रामीण भागात कार्य नाही.

यवतमाळ / घाटंजी –  कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच साथीच्या आजारांनी डोके वर काढले असतानाच पाणी व स्वच्छता गावात जनजागृती अश्या एक ना अनेक गंभीर समस्या उदभवल्या असताना सुध्दा ग्रामीण भागातील दुवा समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती कडून कोणतेही कार्य अथवा जनतेला जागृत करण्याचे कार्य दिसत नसल्याने हे कार्य करण्यासाठी या निष्क्रिय घाटंजी पंचायत समितीला अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे.
तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होवून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असतानाही सध्या काही अपवाद वगळता सर्व ग्राम दक्षता समित्या निष्क्रिय झाल्या असून पंचायत समिती मध्ये कार्यरत गट विकास अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्याने त्यांचे यावर कोणतीही निगराणी नाही. त्यामुळे कर्मचारीही वाटेल तसे दक्ष न राहता जील्हाच्या व तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार यांनी सुरुवातीला कोरोनावर चांगले नियंत्रण मिळविले असले तरी सध्या ही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे यामागील कारण शोधणे सुध्दा तेवढेच महत्त्वाचे ठरत आहे. त्यांनी पंचायत समिती कडे सोपविलेली कार्यप्रणाली सुरळीत चालू आहे काय? हे पाहून त्यांना अॅक्टिव्ह करणे गरजेचे वाटत असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे. केवळ पंचायत समितीचे दरवाजे बंद करून आत बसून राहणे, व जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करून कोरोना वर नियंत्रण मिळविता येणार नसल्याचेही वर्तविल्या जात आहे. प्रत्येक ग्रामसेवक मुख्यालयी हजर ठेवून गावपातळीवरील समस्या जाणून त्या सोडविणे गरजेचे आहे. त्यामुळे या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार व वरिष्ठ अधिकारी यांनी येथिल गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून निष्क्रिय घाटंजी पंचायत समितीला अॅक्टिव्ह करून कोरोना या महामारीवर प्रतिबंध करावे असे तालुक्यातील ग्रामीण जनतेकडून मागणी होत आहे.