Home विदर्भ आनंदवाडी गावात चार घरी धाडसी चोरी

आनंदवाडी गावात चार घरी धाडसी चोरी

236

रोख रकमेसह लाखोचा मुद्देमाल लंपास

इकबाल शेख

तळेगांव (शा.पं.) :- तळेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नजीकच्या आनंदवाडी गावातील रहिवासी मुकींदा भानुदास मानकर, नंदु खोडे, संगिता पांडे, गजानन वानखडे इत्यादीं रात्री आपले घरी झोपले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन मुकींदा मानकर यांचे घरातील रोख रकमेसह एकुन पाऊणे दोन लाख रुपयाचे दागीने चोरून नेले आहे.तर ईतर तिन घरी चोरट्यांचे हातात काहिहि लागले नाही.
प्राप्त माहितीनुसार, तळेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नजीकच्या आनंदवाडी येथील रहिवाशी मुकुंदा भानुदास मानकर हे आपल्या परिवारासह दि. १८ चे रात्री १२ वाजता घरातील हाॅलमध्ये झोपले होते. दि. १९ ला पहाटे ४ वाजता वांग्यांचे पोते भरण्याकरीता झोपेतुन उठले असता. त्यांना हाॅलच्या बाजुला असलेल्या खोलीमधील आलमारीतील कपडे अस्ताव्यस्त पडुन दिसले व कपाट सुद्धा उघडे दिसले लागलीच त्यांनी कपाटामध्ये ठेवुन असलेल्या नगदी रुपये व दागीन्यांची पाहणी केली असता. कापुस, चना, तुर विक्रिचे ७० हजार रुपये, चांदीचे ५ सिक्के, तोरड्या, जोडवे, करंडा असे एकुन २५ ग्रम किंमत १२५०/- सोन्याची पोत २० ग्राम, किंमत ५० हजार रुपये, सोन्याची अंगठी, ५ ग्राम किमत १२हजार पाचशे रुपये, सोन्याचे कानातील रिंग, ३ग्राम किंमत ७ हजार पाचशे रुपये, राणी हार १३ ग्रम किंमत ३२ हजार पाचशे रुपये असा एकुन १ लाख ७३ हजार ७५० रुपयाचा माल कोण्यातरी अज्ञात चोरट्यांनी पळविला. तसेच नंदु खोडे, संगीता पांडे, गजानन वानखडे यांचे घरी सुद्धा चोरी करण्याचा प्रयत्न केला असुन त्यांचे घरातुन चोरट्यांचे हाती काहिहि लागले नाही. या प्रकरणी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असुन सुनिल साळुंखे, पोलीस उपविभागीय अधिकारी आर्वी यांचेसह आष्टी पोलीस स्टेशनचे ठानेदार चांदे व तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होवुन पाहणी करुन ठसे तज्ञांसह स्वान पथकास पाचारण करण्यात आले. घटना स्थळाचा पंचनामा करुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांचे मार्गदर्शनात अधिकचा तपास पोलीस उप निरिक्षक पवन भांबुरकर तळेगांव पोलीस कर्मचारी करीत आहे.