Home विदर्भ सत्याग्रही घाटातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळल्याने माजली खळबळ 

सत्याग्रही घाटातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळल्याने माजली खळबळ 

102
0

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घनदाट जंगलात अंदाजे ६० ते ६५ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या घटनेबाबत चर्चेला पेव फुटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फूट ३ इंच उंचीचा, काळी मिशी असलेला सदर अनोळखी कुजलेला मृतदेह सत्याग्रहि घाटातील जंगल परिसरात रविवारी सरपन गोळा करनार्‍या युवकांना सकाळच्या सुमारास आढळला. त्या युवकांनी सदर मृतदेहाची माहिती तळेगाव पोलीेसांना दिली असता तळेगाव पोलीस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासनी करीता ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे पाठविला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर , व सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.