Home विदर्भ गुरांची अवैध वाहतूक करणारे दोन मिनी ट्रक पकडले

गुरांची अवैध वाहतूक करणारे दोन मिनी ट्रक पकडले

188
0

कत्तली करिता नेल्या जात होते जनावरे

इकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : – तळेगांव पोलीस्टेशन मधून आर्वी कडे जात असताना डी. वाय.एस. पी. सुनिल साळुंखे यांना दोन मिनी ट्रक मध्ये कोंबून जनावरे जात असताना त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी लगेच याची माहिती तळेगांव पोलीसांना दिली व लगेच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळावर जात आरोपीसह दोन मिनी ट्रक ताब्यात घेतले.मिळालेल्या माहिती नुसार नागपुर जिल्ह्याचे हद्दीतून आर्वी मार्गे अमानुशपणे गुरे कोंबुन घेवुन जाणारे दोन मिनी ट्रक क्रं. MH 29- AT- 0344 व MH 32 AJ 2470 हे दोन मिनी ट्रक तळेगांव वरुन आर्वीकडे जात असताना वर्धमनेरी नजीकच्या निरकांर कोटेक्स जवळ पकडलले.त्या दोन मिनी ट्रक मध्ये एकूण आठ बैल कोंबून नेल्या जात होते. त्यामधील आरोपी शेख इसराईल शेख युनूस वय 25 ,शेख शाहरुख शेख खालील वय 25 व शेख अन्वेज शेख करीम तिन्ही आरोपी रा. कळंब. जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन गुरांची किंमत अंशी हजार व ट्रकची कि्मत दहा लाख असा एकुन दहा लाख अंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तळेगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून आठ गुरे हे बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने संत लहानुजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील गोशाळेत पालन-पोषण करण्याकरिता नेण्यात आले.याचा पुढील तपास डी. वाय. एस.पी. सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय.पवन भांबुरकर, जमादार राजू साहू ,जमादार संदीप महाकाळकर, पो.शि.अनिल ढाकणे, राहुल ओमुने हे करीत आहे.