Home मराठवाडा लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद..!

लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद..!

105
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम दि १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ७० व दूनगाव येथे १०३ असे एकूण १७३ नागरिकांनी लस घेतली.यावेळी ४५ वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४५ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे.कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय कार्यात लसीबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि जास्तीत जास्त नागरिकांना लस घेता यावी.याकरिता जनतेत जनजागृती व प्रसार मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.सद्या लोकांनी खूप काळजी घ्यावी.भयानक परिस्थिती आहे.कोरोनामुळे मृत्यू प्रणाम वाढले आहे.थोडे दिवस संयम पाळावा.काळजी घेण्याच्या याच उद्देशातून मोफत लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे,अशी भूमिका वैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा सावंत यांनी स्पष्ट केली आहे.

दुनगावचे सरपंच रहीम पठाण,उपसरपंच नकुल जायभाये,वैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा सावंत,पत्रकार आर.व्ही.छल्लारे,मुजीब पटेल,हसन पठाण,ज्ञानेश्वर भिंगारे,अशोक साबळे,अशोक बांगर,एस.ए.पालवे,बबन मंडलिक,शिवाजी कोल्हे,आर.डी.मिसाळ,ज्ञानेश्वर सिरसाट,भगवान वैद्य,कृष्णा मंडलिक,कलीम शेख,मन्सूर शेख,सुभाष जायभाये,संतोष मंडलिक,भाऊ सिरसाट,रणजित जायभाये यांची उपस्थिती होती.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी पी.ई.मोरे,एस.एस उगले,अक्षदा बडे,ए.जे.शेख,कैलास वराडे,टी.सी.अहिरे,एम.एल ढाकणे,वाय.बी.बळी,एन.एस.बिबे,यु.ए.साने,यु.डी.दखणे,विष्णू मिसाळ,ए.ए.शेख,लक्ष्मण जाधव , ए.एस.घुले , पी.जे.मोहिते , व्ही.व्ही.कुरुंद,कानिफनाथ सावंत,गोरखनाथ कोल्हे,अजय मासुळे,नवनाथ उंडे,सुनील गायकवाड,ज्ञानेश्वर झांजे,आशा मंडलिक,प्रयाग जायभाये,गयाबाई पांढरे,मंगल लहामगे,इंदुमती पैठणे,व्ही.बी.बोबडे,सर्व आशा,अंगणवाडी कार्यकर्त्यां,ग्रामस्थ,आरोग्य पथक आदींनी लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.