Home रायगड वांगणी स्टेशनवर वाचवले रेल्वे कर्मचाऱ्याने चिमुकल्‍याचे प्राण…!

वांगणी स्टेशनवर वाचवले रेल्वे कर्मचाऱ्याने चिमुकल्‍याचे प्राण…!

70
0

कर्जत – जयेश जाधव

कर्जत तालुक्यातील तळवडे गावातील वांगणी रेल्वे स्थानकात पॉइंट्स मॅन म्हणून काम करणाऱ्या मयूर शेळके कर्मचाऱ्यांची खूप मोठे धाडस दाखवत एका चिमूरड्या चा जीव वाचवला आहे त्याने दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मध्य रेल्वेच्या वांगणी या महत्त्वाच्या स्थानकावर पॉइंट्स मॅन म्हणून मयूर शेळके कर्जत तालुक्यातील तळवडे तरुण आॅन ड्युटी काम करत होता.दि १७ एप्रिल रोजी असं लक्षात आले की एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्म वरून जात असताना अचानक मुलाचा हात निसटला आणि मुलगा रेल्वे ट्रॅक वर पडला त्यावेळी मुलाच्या जीवाला समोरून येणारी जलद गतीने येणाऱ्या पॅसेंजर ट्रेन मुळे धोका होता. ही गोष्ट लक्षात त्याने क्षणाचाही विचार न करता त्याने जीवाची पर्वा न करता त्या रेल्वे रूळावर धावत जाऊन त्या मुलांपर्यंत पोहचला व त्या लहान मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवर चढला त्यामुळे मुलाला वाचवण्यात यश आले आहे.