Home विदर्भ सत्याग्रहि घाटात कारने घेतला पेट; चिमुकल्यासह तिघे बचावले

सत्याग्रहि घाटात कारने घेतला पेट; चिमुकल्यासह तिघे बचावले

233

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : – नागपुर – अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात धावती रेनाल्ट कारमध्ये तांत्रीक बिघाड होवुन अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही घटना सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. कारमधुन धुर निघत असल्याचे दिसताच कारमधील प्रतिभा बन्सोड स्वत: कारचालक व मालक, पंकंज बन्सोड, पपीता बन्सोड व आठ महिण्याचा चिमुकलासह गाडी बाहेर येताच कारने एकाएकी पेट घेतला सुदैवाने जीवितहानी टळली. पाहता पाहता कार जळून खाक झाली.

भंडारा येथील चालक व मालक प्रतिभा भिमराव बन्सोड वय ४५ वर्ष व त्यांचाच भाऊ पंकज बन्सोड वय ३८ वर्ष, वहिनी साै.पपीता बन्सोड वय ३५ वर्ष व त्यांचा चिमुकला सर्वज्ञ बन्सोड वय ८ महिने रा. सर्व भंडारा हे रेनाल्ट कार क्रं. एमएच ३३- व्ही. ०९५० ने भंडारा वरुन अमरावतीला मयतीवर जात असता चालक व मालक प्रतिभा बन्सोड हिला गाडीत काहि तांत्रीक बिघाड झाल्याचे भासवले असता गाडी थांबवली तेव्हा गाडीच्या इंजिन मधुन धुर निघत असल्याचे दिसले त्याच क्षणी गाडीतील चिमुकल्यासह सर्व बाहेर पडले तेव्हा काहि क्षणातच गाडीने पेट घेतला. त्यामध्ये त्यांचे मोबाईल ,लॅपटाप, नगदी चार हजार रुपये व चांदीचे पैजन असा मुद्देमाल जळुन खाक झाला.सदर घटनेची माहिती तळेगांव पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवुन सिडेटचा पाण्याचा टॅंकर बोलावुन आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यत संपुर्ण कार जळुन खाक झाली होती. घटनेची नोंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन अधिकचा तपास पी.एस.आय. हुसैन शहा, पो.शी. संदिप महाकाळकर, मंगेश मिलके, अमोल इंगोले करित आहे.