Home मराठवाडा ‘ मैत्रेय ‘च्या पैशासाठी महीला झटत आहेत गल्ली ते दिल्ली…

‘ मैत्रेय ‘च्या पैशासाठी महीला झटत आहेत गल्ली ते दिल्ली…

1146

मैत्रेय कंपनीने सिनियर लोकांना मॅनेज केल्याने परतावे मिळण्यासाठी येत आहे अडथळा


जालना -लक्ष्मण बिलोरे

१९९८ साली सुरू झालेल्या मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीज् मध्ये महाराष्ट्र राज्यासह परराज्यातूनही गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.२०१५ पर्यंत मैत्रेय ने व्यवस्थित देवाणघेवाण केली . गडगंज संपत्ती जमा झाल्यानंतर मैत्रेय मॅनेजमेंट’च्या पोटात हरामी आली . मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या विरोधात फसवणूक प्रकरणी नाशिक येथे सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या मध्ये त्रासदायक बाब अशी की.मैत्रेय मध्ये ऐंशी टक्के महिला आहेत.परताव्याची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदार महीला एजंटला त्रास देत आहेत.मैत्रेय कंपनीच्या गद्दार संचालक मंडळाने प्रथम बोलघेवड्या सिनियर लोकांना मॅनेज करून त्यांचे तोंड बंद केले.त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि एजंट यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.औरंगाबाद शहरातील कल्पना महाजन या मैत्रेय कंपनीकडून परतावे मिळण्यासाठी एकाकी लढा देत आहेत.जालना,परभणी जिल्ह्यातून कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक झालेली आहे.दुर्देवाची बाब म्हणजे कुठलीही मैत्रेय परतावे मिळण्यासाठी स्थापन झालेली संघटना मात्र महाजन यांच्या मदतीला आल्याचे दिसून येत नाही.मैत्रेय विरोधात दिल्ली येथे उपोषण केले, मुंबईत मंत्रालयासमोर धरणे आंदोलन केले.राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने दिली.आमदार, खासदार मंत्री यांना साकडे घातले.मुख्यमंत्री उध्वव ठाकरे,आदीत्य ठाकरे,बच्चु कडू, राजेश टोपे, अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल , चंद्रकांत खैरे,,रावसाहेब दानवे यांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत . परंतु गेल्या सहा वर्षांत कुणीही दखल घेतली नाही. गुंतवणूकदार एजंटांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.अनेकांनी लेकिबाळींच्या लग्नासाठी गुंतवणूक केलेली आहे.परतावे मिळत नसल्यामुळे अनेकांची लग्न मोडले आहेत.अशी कैफियत महिलांनी मांडली.