Home महत्वाची बातमी पत्रकारांनो तुमची कोणाला ही कदर नाही बरका..

पत्रकारांनो तुमची कोणाला ही कदर नाही बरका..

614
0

काल परवा एका वाहिनीवर लोक कलावंत रडले

धडपड्या पत्रकारांनो तुमचे त्याव्यतिरिक्त आहे काय तुमची स्थिती?तुमची घरची दशा त्यापेक्षा काय वेगळी?
सांगा की?

पत्रकारितेत काही मोठ्या असामी वतनदार सोडले तर ९० टक्के माध्यम क्षेत्रातील पत्रकार वाऱ्यावर आहेत‌. सध्याच्या कोरोना काळात बेरोजगार पत्रकारांनो तुमच्या संकटात मजुरी , व्यवसायास जागा भांडवल सुद्धा मिळणे सुद्धा दुरापास्त झाले ना – का झाले? , विचार तरी केला का? मग आयुष्यभर राबा किंवा राबता – राबता मरा व राबत्या पत्रकारांचे कोणी नसते हेच अढळ सत्य आहे. पत्रकारितेचा उगमच सामाजिक मुद्द्यांना प्रश्नांना सामान्यांच्या हक्क व अधिकारांना वाचा फोडण्यासाठी आहे. बदलता काल पत्रकारितेसाठी अधिक कष्टाचा मेहनतीचा काळ आहे. साधने सोयी वाढल्या तितके व्याप कष्ट ही वाढले आणि बातमीदारीसाठी नेमून दिलेल्या बिटवर केवळ बैलासारखे राबायचे अन २४ तास सतर्क राहून बातमीदारी करायची का?
बदल्यात कष्टाचा , बातमी मिळवण्यासाठी प्रवास , इंटरनेट , फोन व वेळ खिशातील खर्चाच्या बदल्यात तुटपुंजे मानधन तेही घेणे त्यासाठी बातमीदाराने छापलेल्या बातम्यांचा अहवाल द्या न छापलेल्या बातम्यांचा खर्च आपल्या बोकांडी या जाचक अटी व कसला हो इमानी पणा सगळी लाचारी दुसरं काय?छंद , व्यासंग व बातमीसाठी अनुभव असल्याने कित्येक जण या क्षेत्रात स्वतःचे कमाईवर ही कामे करतात हे ना समाजाला कळते ना नेत्या पुढार्यांना ना संपादक व मालकाला याना या विषयी काही घेणं देणं नसत भाऊ आपल्यातील काही धूर्त मंडळी आपल्या कष्टाळू पारदर्शक पत्रकारितेला बट्टा लावतात त्यांनी पत्रकारिता आपल्या हेतूसाठी स्वीकारली असते अश्या नेत्या , अधिकाऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले पत्रकार यांनी पत्रकारिता थेट या लोकांच्या दावणीला स्वतःचा इमान बांधून ठेवलाय तर काही मंडळीची बेईमानी सुरू असते हेही तितकेच वास्तव मात्र इमाने इतबारे पत्रकरितेसाठी राबणारे असंख्य पत्रकार आजही मोठ्या कष्टाने स्वतःची पदरमोड करून सामाजिक मुद्द्यांना वाचा फोडीत असता.
माफियागिरी , भ्रष्टाचार , अनाचार , अत्याचाराविरोधात आवाज उठवत असतात व त्यांची संख्या ही खूप मोठी आहे. केवळ बोटावर मोजता येतील इतक्या काही स्वार्थी मंडळींपेक्षा इमानी स्वाभिमानी परखडपणे मांडणी करणारे पत्रकार खऱ्या अर्थाने सामाजिक आरसा असतात हेच खरे आहे.
पत्रकार समाजाचा आरसा असतो ना मग समाजाला तो पत्रकार किती हवा असतो? हे ही बघा नाहीतर राबणारा नेहमी टार्गेट असतो त्याला जबाबदार कोण?‌ आपण सुज्ञ आहोत आपणच ठरवा मुद्दा हा होता कोरोनासारखी संकटे आली की एकटे पडणारे वृत्त बातमीसाठी दमदाटया मारहाण केसेस झाल्यावर आपल्याला वाली कोण? अहो मी पत्रकारितेतील इमानी धडपड्या ग्रामीन / शहरी पत्रकारांविषयी लिहितोय‌ ( बड्या सवलती लाटणारे मोठया आसामी विषयी नाही लिहीत त्यांनी वाचू नये ) इमाने इतबारे पत्रकारिता करणाऱ्यांच्या कष्टाची जाणीव कोणाला ही नसते? हे ही तितकेच खरे आम्ही ही कधी आपल्या मुद्द्यांवर अडचणींवर उघड बोलत नाही तर केवळ मोठेपणाचा बुरखा पांघरून मिरवणारे आपण आजच्या स्थितीत धुनी भांडी करणारे असंघटित कामगार रोजगार हमीचे मजुरांपेक्षा अधिक उपेक्षित आहोत हे आधी आपण समजले पाहिजे . शासकीय माध्यमे यांच्याकडून विमा नसतो , आपल्या कुटुंबाचा मेडिक्लेम नसतो , आपली कमाई केवळ जाहिरातीचे तुटपुंजे कमिशन वर असते मात्र जाहिराती मिळतात तरी किती? अहो त्या कमिशन मध्ये केवळ जाहिरात मिळवण्याचा खर्च प्रवास , फोन वेळ हा निघत असतो आयुष्यभर ज्या माध्यमात दैनिकात पत्रकारिता केली त्या माध्यमाच्या जडण घडणीत राबलो त्याच माध्यमात म्हातारपणी चक्कर मारा अन भेटा तिथं जबाबदार मंडळींना अहो अनुभव कित्येकांनी सांगितलाय म्हणून थेट लिहितो ल तेथील कोणाकडे त्या म्हाताऱ्या माणसाचे ऐकायला वेळ नसतो ते सोडा पिण्यासाठी ग्लासभर पाणी ही दिले जात नाही , असे अनुभव खूप मोठ्या मंडळींनी मागील माझ्या लेखावर माझेशी मनमुक्त बोलतांना सांगितले , कित्येकांना औषधे गोळ्या घेण्यासाठी पैसे नाहीत अशी जुनी पत्रकारितेतील मंडळीनी फोनवर संवाद केला त्यांचे ते उद्विज्ञ विचार ऐकून मीही खूपच विचारात पडलो होतो मलाही वेदना झाल्या होत्या ,
दिवसागणिक या क्षेत्रात काही बड्या असामी त्यांना या बाबींशी काही घेणं देणं नसत,मात्र ती मंडळी मोठे पत्रकार म्हणून मिरवत असतात,हेच सर्वत्र दिसतंय…
तुमच्या आमच्यासरख्या सामान्य पत्रकाराना स्वतःला मात्र कष्टाचे काहीही मिळत नाही,बैल भार वाहून मेल्यागत ही सामान्य पत्रकार मंडळी राबत असतात.
इमानी धडपड्या पत्रकारांनो
समाजातील संकटात तुम्ही राबता “पत्रकारांनो तुमच्या संकटात तुम्ही एकटे पडतात हेच वास्तव “
कोरोनाच्या काळात अक्षरशः कित्येक पत्रकारांना जीव गमवावा लागला , बातमीसाठी मेलेला पत्रकार मात्र त्याच्या मरणानंतर त्याची अंत्ययात्रा ही कशी करावी तितकेही अर्थार्जन नसलेली अनेक पत्रकार मंडळी आहेत नुकतीच राजाभाऊ जाधव या पत्रकाराला कोरोनाच्या स्थितीत स्वतःच जीव गमवावा लागला हा राजाभाऊ नेहमी उन्ह,पावसात,थंडीत पायी चालतांना दिसायचा, पोटासाठी त्यांचं फिरणं कोरोनान कायमच थांबवलं,मात्र त्याच्या घरच्यांचं पोट कोण भरणार?घरातील कर्ता मुलगा,पती,बाप गेल्यावर घरची काय हलत होते हे सांगून तरी बधिर समाजाला काय वाटणार हो? नेते अधिकारी सोडा ते स्वार्थी असतात,मात्र समाजाची जबाबदारी केवळ पत्रकारांकडून आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठीच का?बिनपगारी हातावर जगणारा तो पत्रकार घरचे खातो अन समाजासाठी नेहमी लिखाण करतो,प्रशासन नेत्यांना जाब ही विचारतो,मात्र एकीकडे समाज दिवाळी साजरी करतो ना त्या सामान्य पत्रकारांच्या घरी जाऊन बघा,अडचणींचा डोंगर त्या पत्रकारावर असतो असे कित्येक पत्रकार समाजाला,सरकारला,
दिसत नाही त्यावर कोणी आवाज उठवीत नाही,मग आम्हाला एकत्र येऊन त्या पत्रकारांसाठी स्वतःच्या खिस्यातून थोडेफार वर्गणी जमवून त्या दिवंगत पत्रकारांच्या निराधार कुटुंबाला थोडीसी मदत दयावी लागते,
आयुष्यभर राबणारे कित्येक जण याच अनुभवातून जातात,आमचा मित्र शैलेंद्र साळी कित्येक वर्षे आजारात होता मात्र कित्येकांना आम्ही भेटलो त्यांचे फोन माहिती गेली मात्र उपेक्षा कायम होती, अखेर जीवाचा मित्र म्हनुन माध्यमसाथीनी उपचारासाठी हातभार लावला,अहो अशी उदाहरणे फार आहेत,सामान्य पत्रकार नेहमी उपेक्षित आहे,त्याच्या कडून समाजाला खुप अपेक्षा असतात,मात्र प्रसंगात तो राबत असतो, घरचे अपमान अवमान,दमदाटया भोगून स्वतःची राखरांगोळी करून घेणारे आयुष्यभर केवळ समाजासाठी स्वखर्चाने मेहनतीने धोके पत्करून,अपमान,उपेक्षा गरिबी भोगून कित्येक पत्रकार लढत असतात,आवाज उठवतात,मात्र त्याच्यावर वाईट प्रसंग आला,ते आजारी पडले,त्यांच्या मुलांचे ऍडमिशन रखडले,त्यांना व्यवसायास जागा नाकारणे,बैंकेत कर्ज नाकारणे,अपघात झाल्यावर एकटेच पडणे,आजारी झाल्यास गोळ्या औषधासाठी पैसे नसणे,मुला मुलींचे लग्न कार्यासाठी पैसे नसणे,कर्जात डुबने,म्हातारपणात कोणी जवळ नसणं, ना पेन्शन ना जगायला आणा,मग आयुष्यभर समाजाचा आरसा बनवलेला मर मर मेलाच की…
त्याच मात्र कोणी नसत हेच मूळ सत्य हेच खऱ्याखुऱ्या सामान्य पत्रकाराच्या नशिबी येत असत…

राम खुर्दळ – राज्यउपाध्यक्ष
पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य
मो. – 9423055801