Home नांदेड नांदेड जिल्ह्यात 25 मार्च पासून संचारबंदी..

नांदेड जिल्ह्यात 25 मार्च पासून संचारबंदी..

463

संतोष भद्रे

नांदेड – करोना ग्रस्त रूग्णाच्या संख्येचा भडका उडाल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिनांक 25 पासून येत्या चार एप्रिल पर्यंत माननीय जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.शाळा-महाविद्यालय औषधे वैद्यकीय सेवेची सर्व प्रकारची दुकाने हे सुरू राहतील पण बाजारपेठ पूर्ण बंद राहणार तसेच मर्यादित शासकीय सेवेची वाहने सुरू राहणार असून वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन आणि दुरुस्ती करता येईल.

त्याचबरोबर अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
अकरा दिवसाची संचारबंदी लागू झाल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजारात मोठी गर्दी झाली आहे. बुधवारी किराणा दुकान आणि सुपर मार्केट समोर लांब लांब रांगा दिसून येत होत्या. बँकेत ते मोठी गर्दी होती. दारू दुकाने बंद राहणार असल्याने स्टॉक करण्यासाठी अनेकांची घालमेल सुरू होती.तसेच रुग्णवाहिका स्थानिक संस्थांच्या अत्यावश्यक सेवा ची वाहने अग्निशमन अधिकारी, शेतीमाल आणि वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधित वाहने मार्च एड कॉलेजीगसाठी प्रतिष्ठाने बाहेरून बंद ठेवून दोन ते तीन व्यक्तींमध्ये सुरू असणारी कार्यालय यांना संचारबंदी तून वगळण्यात आले आहे. सकाळी दहा पर्यंत दुधाची विक्री व वितरण तसेच वृत्तपत्र वितरण सकाळी नऊपर्यंत आणि माध्यमाच्या कार्यालयांना त्यांच्या कामाच्या वेळा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.रस्त्यावर कारण नसता कोणीही वाहन दिसल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या वाहनांमध्ये जास्तीत जास्त दोन जणांना रुग्णालयात जाणे व परवानगी देण्यात आली आहे. कोणालाही पास दिली जाणार नाही. शासकीय व माध्यम प्रतिनिधी आपले ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे.तसेच होलसेल किराणा दुकान यांना दुपारी बारापर्यंत व्यवहार करण्यास आणि किरकोळ किराणा दुकान यांना या वेळेपर्यंत घरपोच मान देण्याची मुभा देण्यात आली आहेत तसेच वृद्ध नागरिकांना रूग्णालयाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे जिल्ह्यातील सर्व हॉटेल रेस्टॉरंट अँड बिअर बार आणि सर्व प्रकारचे उपग्रह व टपऱ्या पूर्णपणे बंद राहणार आहेत या आस्थापनांना केवळ घरपोच सुविधा देण्यात येईल अत्यावश्यक सेवा व गरज वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असे असेही सांगण्यात आले आहे.