Home नांदेड किनवट लॉकडाऊनचा आज पहिला दिवस जनतेचा व व्यापाऱ्यांचा प्रतिसाद.

किनवट लॉकडाऊनचा आज पहिला दिवस जनतेचा व व्यापाऱ्यांचा प्रतिसाद.

242

मजहर शेख

नांदेड/किनवट, दि. 25 :-  जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या लोकडाऊनचा आज पहिला दिवस होता यावेळी व्यापाऱ्यांनी नियमानुसार आपली प्रतिष्ठाने 12 वाजता बंद करून प्रशासनाला सहकार्य केले तर प्रशासनातील कर्मचारी लोकडाऊन यशस्वी करण्यासाठी झटताना दिसले .

परंतु विनाकारण दुचाकी व चारचाकी वरून फेरफटका कारणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती यातून पोलीस प्रशासनाची लोकडाऊन संदर्भातील अनास्था निदर्शनास येत होती तर शहरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने तंबाखू, गुटका व दारूची विक्री होत होती .
शहरातील विनाकारण किरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाहीतर कोरोना विषाणूच्या प्रादुभावाची साखळी तोडणे शक्य होणार नाही.
यावेळी महसूल प्रशासना तर्फे तहसीलदार उत्तम कागणे हे स्वतः दुचाकी वरून शहरासह परिसरातील परिस्थिती चा आढावा घेताना दिसले तर नगर परिषदेचे कर्मचारी देखील सकाळ पासून लोकडाऊन च्या कामात कमालीची तत्परता दाखवताना निदर्शनास येत होते मात्र नगर परिषद चे कर्मचारी याव्यतिरिक्त त्यांच्या प्रशासकीय कामात एवढी तत्परता दाखवत नाही तो भाग वेगळा पण बाजारपेठ बंद करायचे काम अत्यंत उत्कृष्ट पध्द्तीने ते करतात .
लोकडाऊन च्या विरोधात सूर असून होळी व धुळवडीच्या नंतर लोकडाऊन उठवण्यात यावा अशी मागणी शहरातील हमाल व मापाडी संघाणेकडून करण्यात येत आहे. तर शहरातील काही भागात पडद्या आडून सर्व काही चालू आहे अशीही परिस्थिती होती कारण प्रशासनाकडून सर्व काही आलबेल असल्यासारखी परिस्थिती होती तर यासाठी प्रशासनातील आपापसातील समन्वय कारणीभूत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते.