Home विदर्भ अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारा इसम सायबर सेलच्या जाळयात.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणारा इसम सायबर सेलच्या जाळयात.

242

ईकबाल शेख

वर्धा – जिल्हा फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी वर्धा येथे तिचे आत्याचे घरी राहत होती. दिनांक 23/11/2020 रोजी पिडीत मुलीने तिचे मामा याचे घरी आदिवासी कॉलोनी वर्धा येथे जावून येते असे सांगितले. परंतु परत घरी आली नाही. त्यावरुन फिर्यादी यांनी नातेवाईकांकडे व परिसरात सर्व़त्र शोध घेतला परंतु पिडीत मुलगी मिळुन न आल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरुन पोलीस स्टेषन रागनगर येथे अप.क्र. 648/2020 कलम 363 भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या 17 वर्षीय मुलीस पळवून नेले होते. सदर इसमाचा मागिल चार महिन्यापासुन कसोशिने शोध घेण्यात आला परंतु तो इसम मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यामध्ये लपलेला होता.

गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी जितेंद्र लहारे वय 23 वर्षे हा मध्य प्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाली होती. सदर माहितीवरुन एक पथक तयार करुन मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात येत होते. परंतु आज दिनांक 13.03.2021 रोजी सदर इसम हा सध्या वर्धा येथे आल्याबाबत गोपनिय माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे आरोपीस वर्धा येथील गणेशनगर परिसरातुन अथक प्रयत्न करुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर कार्यवाही मा. प्रभारी पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री महेंद्र इंगळे, सहा. पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे,पो उप नि श्री गोपाल ढोले, पोलीस अंमलदार लोभेश गाढवे, निलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर, अनुप कावळे, विशाल मडावी, अक्षय राउत, प्रकाश गुजर, अंकित जिभे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली-