Home नांदेड सरकारी कामात अडथळा; विनारायल्टी रेती ची चोरी गुन्हा दाखल.

सरकारी कामात अडथळा; विनारायल्टी रेती ची चोरी गुन्हा दाखल.

260

मजहर शेख

नांदेड/माहूर , दि.  १४:- माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे सौ आशा बळीराम मोरे पोलीस पाटील यांनी ट्रॅक्टर अडवुन तपासणी केली असता रेतीने भरलेला दिसल्याने त्यास रायल्टी बाबत विचारणा केली असता.यातील आरोपीनी पोलीस पाटील बाईस हुजतबाजी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व रायल्टी नकाढता सरकार चा महसूल बुडवुन रेती ची चोरी केली म्हणून सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ आशा बळीराम मोरे वय 42 वर्ष पोलीस पाटील वाई बाजार यांच्या फिर्यादी वरून आरोपी-1) ट्रॅक्टर चालक 2) शेख इम्रान शेख नवाब 3) शेख सद्दाम शेख नवाब सर्व रा. पडसा ता.माहुर आज रोजी 08:30 ते 09:00 च्या सुमारास मौजे वाई बाजार येथे दिंगाबर शिंदे यांच्या घरा समोर वाई ते पार्डी जाणारे रोड वर. सौ आशा बळीराम मोरे पोलीस पाटील यांनी ट्रॅक्टर अडवुन तपासणी केली असता रेतीने भरलेला दिसल्याने त्यास रायल्टी बाबत विचारणा केली असता.यातील आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी बाईस हुजतबाजी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व रायल्टी नकाढता सरकार चा महसूल बुडवुन रेती ची चोरी केली म्हणून गुरनं 43/2021 कलम 353,379, 323,504 34 माधवी प्रमाणे सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुडील तपास सपोनि भालचंद्र तिडके करत आहेत.