
विकृत पती विरोधात गुन्हा दाखल ,
अमीन शाह
बुलडाणा : संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण् जिल्ह्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरणं काय?
गेल्यावर्षी 30 जूनला समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी विवाह झाला. पण तो त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यावरुन तो बायकोला सतत शाररिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी दिवाळीच्या दरम्यान माहेरी निघून गेली. त्यानंतर समाधान निकाळजेने घटस्फोट मिळावा, यासाठी स्वतःच्या बायकोचे फोटोचे पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले.
या पोस्टर्सवर “***** असे लिहिले आहे. त्यावर काही मोबाईल नंबरही दिले आहेत. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस ,रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकी दिली आहे.
विशेष म्हणजे या विकृत व्यक्तीने जर घटस्फोट दिला नाही, तर पत्नीच्या बहिणीचे आणि सासूचे ही पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली आहे.
आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल ,
समाधान निकाळजे असे यात आरोपीचे नाव आहे. त्यामुळे महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन अंढेरा पोलिसात भा , द , वि , 507 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने अंढेरा पोलिसानी अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. अद्याप या आरोपीला अटक करण्यात आली नाही. या प्रकारामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे पत्नीचे पोस्टर लावून त्याखाली नंबर लिहिणे चुकीचे आहे, असेही काहींचे म्हणणं आहे.











































