Home मराठवाडा अठरा विश्व दारिद्रय झटकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा शाहिर…

अठरा विश्व दारिद्रय झटकून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा शाहिर…

685

शिवशाहीर अरविंद घोगरे म्हणजे जालना जिल्ह्याचे वैभव आहे – रामेश्वर लोया

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

मराठवाडा विभागातील जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेवून शिक्षण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मत्स्योदरी शाळेत माध्यमिक शिक्षण घेतलेल्या अरविंद घोगरेने शालेय जीवनात नाटक,स्नेहसंमेलन असो कि वक्त्रृत्व स्पर्धा हिरीरीने भाग घेवून प्रेक्षकांची मने जिंकली होती.मच्छिंद्रनाथ चिंचोली सारख्या छोट्याशा गावातून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत आज शाहिरीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोटतिडकीने कथन करून नावलौकिक मिळवत आहेत.शाहिरी अरविंद घोगरे शाहिरी बाण्यातून शिवरायांचा इतिहास मांडतांना सुतळीबाॅंब फटाक्यांची लड पेटून उठावी असे धाडधाड गर्जना करतात तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.शाहिर अरविंद घोगरे यांची शाहिरी राज्यभर घुमत आहे.शिवशाहिर अरविंद घोगरे म्हणजे जालना जिल्ह्याचे वैभव आहे , घनसावंगी तालुक्याची शान आहे,अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांनी प्रशंसा केली.