Home परभणी वडाचा मारोती संस्थानाच्या विकासाची जबाबदारी ग्रामस्थांची – ह. भ. प. सुपेकर महाराज

वडाचा मारोती संस्थानाच्या विकासाची जबाबदारी ग्रामस्थांची – ह. भ. प. सुपेकर महाराज

163

परभणी प्रतिनिधी

संपूर्ण परभणी जिल्ह्याभर ख्याती, महती असलेल्या वडाचा मारुती या प्रसिद्ध संस्थानाच्या विकासाची जबाबदारी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे अस प्रतिपादन ह-भ-प विजयानंद महाराज सुपेकर यांनी केले. ते पडेगाव शिवारातील वडाचा मारुती संस्थानात आयोजित सप्ताहाच्या सांगता समारंभात काल्याचे कीर्तना वेळी शनिवारी बोलत होते.

मागील सात दिवसापासून वडाचा मारुती संस्थानात सुरू असलेल्या भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवारी सांगता झाली पडेगाव, बनपिंपळा, सुरळवाडी, उमला नाईक तांडा, खादगाव, मरगळवाडी, वडगाव स्टेशन आदी प्रमुख गावासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे वडाचा मारुती हे मोठं श्रद्धास्थान आहे. काल्याच्या कीर्तनात बोलताना ह भ प विजयानंद महाराज सुपेकर पुढे म्हणाले की, या संस्थांनाची ख्याती सर्वदूर आहे. आधुनिक काळात वाहनाने दर्शनासाठी येण्याकडे भक्तांचा ओढा असतो. त्यासाठी आपल्या भागात हे संस्थान असल्याने या संस्थानात दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांचे सोयीचं व्हावं म्हणून रस्ता करने ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. भर पावसाळ्यातही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीचा होईल असा रस्ता ग्रामस्थांनी बनवावा. त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी आपल्या जमिनी चा थोडासा भाग घ्यावा. येथे येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र आणि स्वच्छ जलकुंभ उभारून पुण्य पदरात पाडून घ्याव. आजच्या घडीला या संस्थानात दर्शनासाठी येण्यासाठी रेल्वेपटरी ने पायी येण्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि अशाप्रकारे रेल्वेपटरीने प्रवास करणे धोकादायक असतं, असेही महाराजांनी सांगितले. आयोध्या स्थितीत राम मंदिर बांधकामासाठी प्रत्येक भारतीयाने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. वर्षानुवर्षांपासून वीज पुरवठा पासून अंधारात असलेल्या या देवस्थानास पोल उभारणी करून कायमस्वरूपी वीज पुरवठा करून दिल्याबद्दल महावितरणचे कर्मचारी भेंडेकर व गोविंद यादव यांचा महाराजांनी सत्कार केला. मागील वर्षी लोकसभा उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व दत्तराव करवर यांनी कायमस्वरूपी वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला होता. यावेळी ह.भ.प.तुलसीदासस महाराज देवकर यांचेही किर्तन संपन्न झाले. ह भ प भगवानदेव कुलकर्णी यांनी सात दिवस भाविकांना आपल्या मधुर वाणीने भागवत कथा सांगितली. उपस्थीत महाराजांचे स्वागत विजय निरस, नागनाथ निरस, शिवाजी महाराज बोबडे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास काकां नीरस यांनी केले. उपस्थित हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.