Home जळगाव ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आव्हान म.रा.उर्दू शिक्षक संघटना

” आदर्श शिक्षक पुरस्कार ” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आव्हान म.रा.उर्दू शिक्षक संघटना

127
0

रावेर (शरीफ शेख) 

येत्या 14 फेब्रुवारी 2021 रविवार रोजी सावदा. ता. रावेर जि. जळगाव येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा शिरीष मधुकर राव चौधरी हे राहणार आहे.
तसेच या कार्यक्रमात डॉ . अ.करीम सालार यांना ” द सेंट आफ एजुकेशन ” ( नाशिक विभाग स्तरीय) या सन्मानाने व ” डॉ .पकिज़ा उस्मान पटेल ” व डॉ .उस्मान फकिरा पटेल ” (पाचोरा) या दाम्पत्यंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमा मध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए.गफफार, अल्हाज हारून शेख, तुकाराम बोरोले सर, हाशिम अली, व इतर यांची प्रमुख उपस्थिती राहिल.
तरी जळगांव जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमीक शाळेतील कर्मचारी यांनी आपआपले प्रस्ताव सादर करण्यचे आव्हान संघटनेचे विभागीय सचिव गौस खान, जिल्हा अध्यक्ष नफीस अहमद, असलम खान,कमाल शेख, आसिफ खान,मुजीब शेख रईस खान,जावेद अख्तर , व इतर पदाधिकाय्रांनी लेखी निवेदन द्वारे केले आहे.