Home विदर्भ गांधी विद्यालयातील एन.सी.सी छात्र सैनिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिली मानवंदना

गांधी विद्यालयातील एन.सी.सी छात्र सैनिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिली मानवंदना

153

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा आर्वी तालुक्यातील स्थानिक नगरपरिषद गांधी विद्यालयातील छात्र सैनिकांनी 23 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता शाळेतून सायकल रॅली संपूर्ण शहरातून नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सायकल रॅली काढली यामध्ये एनसीसी छात्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना मोठमोठ्या ने घोषवाक्य देऊन परीसर दणाणून टाकला.सोबतच सायकल चालवायला शिका, मास्क है जरूरी. मास्क नही तो टोकेंगे ,कोरोना को हम रोकेगे अश्या घोषणा दिल्या. सायकल रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक गुरुनानक धर्मशाळा, बाजार येथून परत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ येऊन समापन झाली त्यानंतर छात्र सैनिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानवंदनाे देऊन राष्ट्रगीत म्हटले आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आपण मोठ्या संख्येने सशस्त्र सेनेमध्ये सहभागी होऊन देशाची सेवा करावी हे या विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवलं . सीनियर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे घोषवाक्य असलेले त्यांचे फोटो काढून ते आपल्या सायकलवर बॅनर लावले होते या सायकली मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका उषा नागपुरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.एन सी सी छात्रसैनिकांनी अधिकारी प्रमोद नागरे यांनी मार्गदर्शन केले.