जळगाव

रावेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे मोदींचा जाहीर निषेध …

वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकावर कठोर कारवाई करण्यात यावी.

शरीफ शेख

रावेर , दि. १५ :- नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारया पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात वरील विषयाला अनुसरून निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे आरध्यदैवत आणि अस्मितेचा सर्वोच्य अभिमान असलेल्या छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचे मोदी पुस्तक भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहले असून ह्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले असून या पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्यात आलेल्या आहे तरी या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी व या पुस्तकाच्या लेखकावर कठोर कारवाई करण्यात यावी.
छ्त्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही…ह्या वादग्रस्त पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी अन्यथा रावेर तालुका काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल.असे जाहिर निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेशवर महाजन,विलास ताठे, महेश लोखंडे,
सुर्यभान चौधरी,शे कौसर,शे सलीम शेख कलीम, कैलास वाणी, शे गयास , प्रविण घेटे,
प्रकाश महाजन, संतोष पाटील, विकास मराठे, आयुब खा, नबाव तडवी, बाळू पाटील, दत्तात्रय सोनार , रामदास लहासे, प्रकाश सुरदास, सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like

जळगाव

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी केली जम्बो कार्यकारिणी जाहीर… आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप…

अमळनेर  –  येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आमदार अनिल ...
जळगाव

ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशिय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशिय सभागृहाच्या ...
जळगाव

आरटीई नुसार झालेल्या प्रवेशप्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वावडदा येथील पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन रावेर (शरीफ शेख) जळगाव जिल्ह्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश ...