Home जळगाव रावेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

रावेर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

70
0

रावेर ( शरीफ शेख ) : आज दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रावेर येथील सिद्धार्थ नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या राहत्या घरी भगवान बुद्ध महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिप व धुप पूजा करुन त्रिशरण पंचशील घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याधेक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक ठिकाणी अभिवादन न करता आपल्या निवास्थानी अभिवादन करावे. म्हणून आज दि.६ डिसेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ वा महापरिनिर्वाण दिन वंचित बहुजन आघडीचे रावेर ता. अध्यक्ष बाळु शिरतुरे यांनी घरामधेच अभिवादन केले. या प्रसंगी घरातील मंडळी उपस्तित होते. त्यात संघरत्न शिरतुरे, बुद्धरत्न शिरतुरे , ज्योति शिरतुरे , कोमल शिरतुरे , काजल शिरतुरे , भावना शिरतुरे , सोहन शिरतुरे , भूषण तायडे , यश मोहासे, परी शिरतुरे इत्यादि उपस्तित होते.