Home महत्वाची बातमी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात निवडणूक यंत्रणा...

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज

50
0

 

मझर शेख ,

नांदेड/किनवट,दि: ३०:- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्र असून या मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. .मतदान पथक व क्षेत्रिय अधिकारी यांच्या प्रत्येक वाहनावर ( 14 ) जीपीएस सिस्टिम लावण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, यांनी दिली.

तहसील कार्यालय, किनवट येथे सोमवार ( दि. 30 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8 वाजता सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी बोलतांना सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार, भाप्रसे, म्हणाले की, ही निवडणूक अत्यंत पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे, बिनचूक पार पाडावी, कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता प्रत्येक बाब काटेकोरपणे सांभाळावी.

यावेळी तहसीलदार उत्तम कागणे, नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम, मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण दिले. याप्रसंगी स्वामी मल्लिकार्जुन, राम बुसमवार यांनी मतपेटीचे प्रात्यक्षिक दाखविले.

शेवटचे टोक असलेल्या मांडवी येथील मतदान केंद्राच्या पहिल्या पथकास सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सर्वप्रथम रवाना केले. यावेळी क्षेत्रिय अधिकारी डॉ.एस.एन.आडपोड, प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर व अनिलकुमार महामुने उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील,पी.पी. सूर्यवंशी, एस.बी.सरनाईक, गोविंद पांपटवार, एम. एम. कांबळे, टोम्पे, नितीन शिंदे आदि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत.