Home महत्वाची बातमी अजानमध्ये खूप गोडवा असतो !

अजानमध्ये खूप गोडवा असतो !

123

 

शिवसेनेचे विभागप्रमुख
विद्यार्थ्यांसाठी भरवणार ‘ अजान स्पर्धा

अमीन शाह ,

मुंबई : काँग्रेस , राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला . कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारनं सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती . त्यावरूनही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं . यानंतर आता पुन्हा एकदा भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे . शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे . बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली . याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे . अजानमध्ये फार गोडवा असतो . ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल , असं मनाला वाटतं राहतं , अशा शब्दांत सपकाळ यांनी अजानचं कौतुक केलं आहे .