Home विदर्भ सामाजीक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या….!

सामाजीक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या….!

38
0

चंद्रपूर  , दि. ३० –  समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात व वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे (करजगी ) यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली . आनंदवन मध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ मोठ्या प्रमाणात हादरंल आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते पण त्यापूर्वी शीतल यांची प्राणज्योत मालवली तर शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आलं आहे. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

Previous articleشروع ہونگی دہلی، فیروز پور، ممبئی کے لئے مزید ٹرینیں
Next articleअजानमध्ये खूप गोडवा असतो !
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.