Home जळगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे कांदा निर्यात बंदीचा निषेध

शहर काँग्रेस कमिटीतर्फे कांदा निर्यात बंदीचा निषेध

125

लियाकत शाह

भुसावळ – शहर काँग्रेस कमिटीतर्फे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारच्या निर्णयाचाच जोरदार घोषणाबाजी करून बुधवारी निषेध करण्यात आला. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कांद्याच्या माळा गळ्यात घालून निषेध निवेदनाचा आशय असा की, जगभरात लाकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांने कांद्‌याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येवू लागल्याचे दिसत होते, चार पैसे हातात पडतील अशी शेतकऱ्यांला आशा होती पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. 4 जून 2020 रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतल आणि तीन महिन्यात घुमजाव करून निर्णय बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांदयाचे भाव कोसळुन शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यांची होती उपस्थिती प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, राजेंद्र श्रीनाथ, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, किशोर जाधव, सुकदेव सोनवणे, प्रदीप नेहते, जॉनी गवळी, नारायण भोई, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, युवक विधानसभा अध्यक्ष इमान खान, जिल्हा महिला सरचिटणीस राणी खरात, महिला जिल्हा उपाध्यक्ष हमीदा गवळी, भुसावळ शहर सरचिटणीस शैलेश अहिरे आदींची उपस्थिती होती.