Home जळगाव सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

161

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा जळगाव येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी च्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.कोरोना महामारी मुळे घोषित झालेल्या लॉकडाऊन च्या काळात अनेक गोरगरीब,हातमजुरी करणाऱ्या नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते अशा वेळी सुमित पाटील यांनी अनेक कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू,किराणा साहित्य,भाजीपाला वाटप असे सामाजिक कार्य केले,खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय गृपच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विवाह समारंभ कमी लोकात,कमी खर्चात करून शासनाचे नियम पाळण्याचे सतत आवाहन केले तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून लोकांमध्ये कोरोना विषयक नियम पाळणे,काळजी घेणे असे जनजागृतीपर कार्य केले या सर्व कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून यापुढे देखील अशाचप्रकारे सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे यावेळी सुमित पाटील यांनी सांगितले.