Home मराठवाडा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण

164
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

आज दिनांक 17 सप्टेंबर 2020 वार गुरूवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा,गोदावरी पब्लिक स्कूल कुं. पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र तौर अध्यक्ष-सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकरी विनोद कऱ्हाडे व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण व गोदावरी पब्लिक स्कूल शाळेचे प्रशासक विनायक कदम हे उपस्थित होते.यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनीराष्ट
राष्ट्रपिता महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र तौर यांनी केले.
त्यानंतर शाळेतील उपस्थित शिक्षकांनी मराठवाडा मुक्ती दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तौर यांनी मराठवाडा मुक्ती दिनाविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी शाळेतील शिक्षक,मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ खिस्ते यांनी केले.तर आभार मोहन अवचार यांनी मानले.