विदर्भ

बोगस पिक कर्जाची सहा प्रकरणे उघडकीस.!

Advertisements
Advertisements

योगेश कांबळे

आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता.!

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यात शेती संबंधित बोगस कागदपत्रे तयार करुण पिककर्जासाठी बँकेला गडविणार्या मास्टर मांइड आकाश खंडाते यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र मधून जुलै 2019 मध्ये एक लाख 65 हजारांचे बोगस सात बारा कागदपत्रे देवून कर्ज उचलून बॅंकेची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
एकोणतीस बठे एक मौजा बोपापूर येथील शिवारात एक हेक्टर 98 आर. शेती दाखवून कर्जाची उचल केली. वास्तविक ही शेती विजय गेडाम यांच्या मालकीची असून आकाश खंडाते नी बनावट कागदोपत्री बॅंकेला स्वतः च्या नावे दाखविली.
एकुण आतापर्यंत सहा प्रकरणे बोगस पिक कर्ज घेणार्याचे पोलीसांनी उघडकीस आणले आहे. यामध्ये कॅनरा बॅंकेचे तीन , बॅंक ऑफ महाराष्ट्र चे दोन तथा बॅंके ऑफ बडोदाचे एक प्रकरणाचा समावेश आहे.
अजूनही आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकारी देवळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी सांगितले.
सध्या सहा आरोपीपैकी तीन आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळाली आहे. उर्वरीत तिन आरोपींना न्यायालय कोठडीत पाठविले आहे.
या प्रकरणाचा मास्टरमाईड संगणक चालक आकाश खंडाते यांनी कॅम्पुटर वर स्व:ताच शिक्के तयार केली असल्याची माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे.
या प्रकरणात बॅकेचे कोणी कर्मचारी सहभागी आहे का?हे पोलीस तपासून बघत आहे. येत्या दोन दिवसात तपास उघडकीस येवून अजून काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे सर्व बाजुने तपास करीत असून कोणत्याही आरोपींची गय केल्या जाणार नसल्याचे सागितले. अजून प्रकरणे उघडकीस आल्यास आरोपीची पोलीस कस्टडी वाढविली जाईल. स्वतः पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे बॅंकेना भेटून योग्य दिशेने तपास करीत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...